Military Boost देशाच्या सुरक्षेसाठी मोठा टप्पा ! लष्कराला मिळणार 156 लढाऊ हेलिकॉप्टर

31 Mar 2025 18:00:54

heli
 
दिल्ली : Military Boost  हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून (एचएएल) 156 हलके लढाऊ हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी 62,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या कराराला सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीने मंजुरी दिली आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडसाठी ही आतापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर Military Boost आहे. हेलिकॉप्टरची निर्मिती कर्नाटकातील बेंगळूर आणि तुमकूर येथील त्यांच्या प्रकल्पांमध्ये केली जाणार आहे.
 
 
संरक्षण सूत्रांनुसार, 156 हलके लढाऊ हेलिकॉप्टर भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दलात विभागले जातील. यापैकी 90 हेलिकॉप्टर भारतीय लष्कराला आणि उर्वरित भारतीय हवाई दलाला देण्यात येतील. या हालचालीमुळे चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरील कारवाया अधिक मजबूत होण्यास मदत होईल. आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत मेक इन इंडियाद्वारे संरक्षण उत्पादनात स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करण्याच्या आपल्या हेतूवर सरकार भर देत आहे. त्याअंतर्गत सरकारने स्वदेशी संरक्षण प्रणालींसाठी सर्वात मोठी ऑर्डर दिली आहे.
Powered By Sangraha 9.0