Abu Azmi अबू आझमींच्या वक्तव्यावरून विधिमंडळात गदारोळ ! निलंबन करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

04 Mar 2025 21:17:29

abu 
 
मुंबई -  समाजवादी पार्टीचे आमदार अबू असीम आझमी Abu Azmi यांनी औरंगजेबाची स्तुती केल्याच्या विधानाचे पडसाद मंगळवारी विधानसभेत उमटले. सत्ताधारी आमदारांनीच सभागृहात जोरदार गदारोळ केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सत्ताधारी पक्षाच्या अनेक आमदारांनी अबू आझमी Abu Azmi यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात यावे अशी मागणी केली. यावरून निर्माण झालेल्या गदारोळामुळे सभागृह तीन वेळा तहकूब करण्यात आले. मात्र सत्ताधारी आमदार आझमींवर Abu Azmi कारवाईच्या मागणीवरून आक्रमकच राहिल्याने अखेर सभागृहाचे कामकाज विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिवसभराकरिता स्थगित केले.
 
सत्ताधारी आक्रमक
 
- विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रश्नोत्तराचा तास केवळ पुकारलाच होता. तेव्हा भाजप आमदार महेश लांडगे यांनी आझमींच्या वक्तव्याचा मुद्दा उपस्थित केला. छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मासाठी मरण पत्करले पण दुसरा धर्म स्वीकारला नाही. या असल्या औलादी रस्त्यावर नेऊन ठेचल्या पाहिजेत असे लांडगे म्हणाले. अतुल भातखळकर म्हणाले, ज्या औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली. Abu Azmi
 
 
- हिंदूंवर जिझिया कर लावला. मंदिरे उद्ध्वस्त केली. त्या औरंगजेबाचे कौतुक अबू आझमी करतात हे देशद्रोही कृत्य आहे. आझमींवर देशद्रोहाचा खटला दाखल करा, त्यांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करा असे भातखळकर म्हणाले. Abu Azmi
 
- सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ज्या औरंग्याने बापाला कैदेत ठेवले, भावाला मारले. खरे तर त्याची कबर तोडण्याचा निर्णय घेतला पाहिजे. मतांच्या राजकारणासाठी तुष्टीकरणासाठी जर पापी विचार बोलणार असेल तर अध्यक्ष महोदय संविधानाचा दांडपट्टा काढा आणि या विचारांचे तुकडे तुकडे करा. आझमींना निलंबित करा. पुन्हा या देशात कोणी अशी हिंमत करता कामा नये असे मुनगंटीवार म्हणाले.Abu Azmi
 
- मंत्री उदय सामंत यांनी देखील ज्या पद्धतीने औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्यात येत आहे त्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून निलंबित करा ही आमची मागणी असल्याचे म्हटले.Abu Azmi
 
आझमींना निलंबित करण्याची हिंमत दाखवा
 
आम्ही याच विषयावर स्थगन प्रस्ताव दिला आहे. केंद्रात आणि राज्यात सरकार तुमचे आहे. सरकार नेमके काय करते आहे. या प्रकरणी कारवाई करा. अबू आझमीवर कारवाई करा. तुम्हाला समाजा समाजात वाद निर्माण करायचा आहे असे शिवसेना उदधव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते भास्कर जाधव म्हणाले. 
 
देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा-एकनाथ शिंदे
 
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकऱ्याचे औरंग्याचे गोडवे अबू आझमीने Abu Azmi गायले. त्याचा मी निषेध, धिक्कार करतो. त्यांनी यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराजांबददल चुकीचे वक्तव्य केले होते. आझमी हे जाणीवपूर्वक अपमान करतात. संभाजीमहाराजांनी प्राणांचे बलिदान दिले पण धर्म बदलला नाही. आझमी Abu Azmi देशद्रोही आहे. या देशद्रोह्याला या सभागृहात बसण्याचा अधिकार नाही. त्यांना निलंबित करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशा भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केल्या.
 
आझमींनी शब्द घेतले मागे
 
या प्रकरणी वाढता वाद पाहता आझमी Abu Azmi यांनी आपले वक्तव्य मागे घेतले आहे. एक्स पोस्टवरून अबू आझमी Abu Azmi यांनी याबाबत माहिती दिली. माझ्या विधानाची मोड-तोड करून ते दाखण्यात आले. औरंगजेब यांच्याबद्दल मी तेच वक्तव्य केले जे इतिहासकारांनी आपल्यासमोर मांडले आहे. मी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज किंवा अन्य कुठल्याही महापुरुषाबद्दल कोणत्याही प्रकारचे अपमानजनक वक्तव्य केले नाही. तरीदेखील माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माझे शब्द मागे घेतो, असे त्यांनी म्हटले आहे. Abu Azmi
Powered By Sangraha 9.0