मुंबई: (Dhananjay Munde Resigns) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा त्याग केला (Dhananjay Munde Resigns) आहे. वाढता जनक्षोभ आणि राजकीय दबाव यामुळे हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. या संपूर्ण प्रकरणावर बोलताना शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी म्हटले होते की, "सर्व काही लवकरच स्पष्ट होईल. (Dhananjay Munde Resigns) सरकारच्या प्रतिमेचा प्रश्न आहे, आणि लोकांचा विश्वास टिकवणे आवश्यक आहे" धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे (Dhananjay Munde Resigns) राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
या संपूर्ण प्रकरणात भाजप नेते सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि मुद्दा ठामपणे उचलून धरला. (Dhananjay Munde Resigns) धस यांनी सातत्याने या प्रकरणावर आवाज उठवत कठोर कारवाईची मागणी केली होती. त्यांचा वाढता दबाव आणि जनतेचा संताप पाहता अखेर मुंडे यांनी आपल्या पदाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला (Dhananjay Munde Resigns).
काय आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण ?
संतोष देशमुख हत्या प्रकरण महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि क्रूर हत्येशी संबंधित आहे. 10 डिसेंबर 2024 रोजी त्यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती, ज्यामुळे राज्यभर खळबळ उडाली. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde Resigns) यांचे निकटवर्ती समजले जाणारे वाल्मिक कराड यांच्यासह नऊ आरोपींना मोक्का कायद्याखाली अटक करण्यात आली आहे.
तपासादरम्यान, सीआयडीने आरोपी महेश केदारच्या फोनमधून संतोष देशमुख यांच्यावर झालेल्या अमानुष मारहाणीचे 15 व्हिडिओ आणि 8 फोटो जप्त केले आहेत, ज्यात आरोपी हसत-खिदळत असल्याचे दिसते (Dhananjay Munde Resigns). सीआयडीने 1400 पानांचे आरोपपत्र बीडच्या विशेष मकोका कोर्टात सादर केले आहे, ज्यात या व्हिडिओ आणि फोटो पुराव्यांचा समावेश आहे. या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे, आणि आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.(Dhananjay Munde Resigns)