Explanation on Munde's resignation माझ्या सद्सद् विवेक बुद्धीला स्मरून - धनंजय मुंडेंच राजीनाम्यावर स्पष्टीकरण

Top Trending News    04-Mar-2025
Total Views |

dhana
 
बीड - Explanation on Munde's resignation मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर यावर स्पष्टीकरण दिले आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी त्यांची ठाम मागणी होती. या प्रकरणाच्या तपासानंतर आरोपपत्र दाखल झाले असून, न्यायालयीन प्रक्रिया सुरू होणार आहे. (Explanation on Munde's resignation)
 
धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याचे कारण स्पष्टीकरण (Explanation on Munde's resignation) देत सांगितले की, "माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून मी हा निर्णय घेतला आहे. मागील काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ आहे. डॉक्टरांनी उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला आहे."(Explanation on Munde's resignation)
 
 
नुकतेच काल पुढे आलेल्या काही फोटोंमुळे समाजमन अस्वस्थ झाले आहे. या हत्येच्या घटनेने मुंडे स्वतःही व्यथित असल्याचे सांगितले जात आहे. (Explanation on Munde's resignation) हत्येच्यानंतर त्यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, या संपूर्ण घटनेचा राज्याच्या सत्तासमीकरणांवर नक्कीच परिणाम होणार आहे. आता मुख्यमंत्र्यांचा पुढील निर्णय काय असेल, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. (Explanation on Munde's resignation)
 
संतोष देशमुख यांच्या हत्येचे अत्यंत क्रूर फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. या फोटोंमध्ये आरोपींनी संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे आणि छळ करतानाचे दृश्य दिसत आहेत. हे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आणि बीड जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली.  
 
या प्रक्रियेनंतर काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -
 
 
 
 
 या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि अन्य आरोपींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी सर्वत्र होत आहे. राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते या घटनेचा तीव्र निषेध करत आहेत आणि न्यायाची मागणी करत आहेत.
 
या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना काय म्हणाल्या सुप्रिया सुळे -