IND vs AUS Champions Trophy टीम इंडियाची विजयी घोडदौड ! ऑस्ट्रेलियाला धूळ चारत चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये जोरदार प्रवेश

Top Trending News    04-Mar-2025
Total Views |

team
 
IND vs AUS Champions Trophy क्रिकेट प्रेमींना भारतीय संघाने आनंदाची बातमी दिली आहे. भारताने ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळविल्याने चाहत्यांना जल्लोष गगनात मावेनासा झाला आहे. आजचा या सामन्यात भारतीय संघाने उत्कृष्ट फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन करत ऑस्ट्रेलियाला नतमस्तक होण्यास भाग पडले आहे. IND vs AUS Champions Trophy तसेच, आपला बदल पूर्ण केला आहे. पहिल्या उपांत्य फेरीत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा ५ विकेट राखून पराभव केला आहे. तसेच सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली. ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी २६५ धावांचे आव्हान दिले होते.
 
भारताचा विजयी डाव, गोलंदाजांचा कहर
 
किंग कोहलीने ८४ धावा करत विजय भारतासाठी ओढून आणला आहे. विराट-श्रेयसची ९४ धावांची भागीदारी ही विजयासाठी महत्वपूर्ण ठरली आहे.  IND vs AUS Champions Trophy हार्दिकचे दोन षटकार आणि राहुलच्या विजयी षटकाराने भारताचा विजय पक्का केला आहे. भारताने ऑस्ट्रेलियावर ४ विकेट्सने विजय मिळविला आहे. तसेच, अंतिम फेरीत आपली जागा नक्की केली आहे. टीम इंडियाच्या विजयाचे श्रेय मोहम्मद शमी आणि विराट कोहलीला दिले जात आहे. तर विराट कोहली सामन्याचा सामनावीर ठरला आहे. IND vs AUS Champions Trophy भारतीय संघाच्या या ऐतिहासिक विजयानंतर क्रिकेट चाहत्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.
 
 
सुरूवातील भारताने २ विकेट्स गमावल्या पण, नंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने ९८ धावांची भागीदारी करत बाजू सावरली. IND vs AUS Champions Trophy विराट कोहली पाच चौकारांसह ९८ चेंडूत ८४ धावा करत बाद झाला. श्रेयस अय्यरने ४५ धावांची खेळी केली. तर अक्षर पटेलने २७ धावांची खेळी केली. हार्दिकने शानदार ३ षटकार आणि एक चौकार लावला आणि संघाचा विजय पक्का केला. केएल राहुल ४२ धावा करत तो नाबाद परतला आहे. IND vs AUS Champions Trophy