Abu Azmi Suspension वादग्रस्त वक्तव्याची शिक्षा ! अब्बू आजमी विधानसभेतून निलंबित

Top Trending News    05-Mar-2025
Total Views |


abu

मुंबई : Abu Azmi Suspension समाजवादी पक्षाचे आमदार अब्बू आसिम आजमी यांनी औरंगजेब याच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे महाराष्ट्र विधानसभेत अतिशय तीव्र पडसाद उमटले. त्यांच्या वक्तव्यावरून भाजप व शिंदे गटाच्या आमदारांनी संताप व्यक्त करत कडाडून विरोध केला. सत्ताधारी पक्षाने आजमी यांच्या निलंबनाची मागणी Abu Azmi Suspension केली आहे. ही मागणी मान्य झाली असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा - Bhujbal's Entry धनंजय मुंडेंची विकेट अन् भुजबळांची एंट्री ? मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीत 'हे' 4 नेते स्पर्धेत

आजच्या अधिवेशनात या विषयावर मोठा गदारोळ पाहायला मिळाला. विरोधकांनी या मुद्यावर आक्षेप घेत विधानसभेत जोरदार गोंधळ घातला आहे. भाजप आमदारांनी आजमी यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली Abu Azmi Suspension. त्यानंतर सभागृहात मतदान घेण्यात आले. अब्बू आजमी यांना अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्याचा निर्णय Abu Azmi Suspension यावेळी घेण्यात आला.

आता या निलंबनामुळे Abu Azmi Suspension राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता नाकारता येत नाही. समाजवादी पक्षाने या कारवाईचा तीव्र निषेध केला असून हा लोकशाहीवरील हल्ला असल्याचे म्हटले आहे. तर, सत्ताधारी पक्षाने हा निर्णय योग्य असल्याचे सांगितले आहे. विधानसभेतील या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात वादळ निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहे. Abu Azmi Suspension