राज्यभर निर्माण झालेल्या आक्रोशाच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या मंत्रिपदी कोणाला संधी मिळणार, याबाबत Bhujbal's Entry आता राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. मंत्रिमंडळातील गच्छंतीमुळे नाराज असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ Bhujbal's Entry यांचं या निमित्ताने पुनर्वसन करण्याचा प्रयत्न पक्षाकडून केला जाण्याची शक्यता आहे. भुजबळ यांच्यासह बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीच नेते आणि पाचव्या टर्मचे आमदार प्रकाश सोळंके हे देखील मंत्रिपदाच्या स्पर्धेत आघाडीवर आहे.Bhujbal's Entry
सरपंच हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायला हवा, अशी जाहीर भूमिका प्रकाश सोळंके यांनी घेतली होती. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये मंत्री असलेले राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटील यांना विद्यमान सरकारमध्ये मंत्रिमंडळात संधी मिळाली नव्हती. Bhujbal's Entry आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्याही नावाचा विचार केला जाण्याची शक्यता आहे. संजय बनसोडे हेदेखील शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. मात्र यंदा त्यांना संधी देण्यात आली नव्हती. आता मंत्रिपदाची एक जागा रिक्त झाल्यानंतर त्यांच्या नावाचा विचार होतो का, हे पाहावं लागेल. Bhujbal's Entry
राष्ट्रवादीने राजीनाम्याला दिला नैतिकतेचा रंग मंत्री धनंजय मुंडे यांचा या प्रकरणाशी संबंध आहे असे तपासात समोर आलेले नाही, मात्र नैतिकतेच्या मुद्यावर एक जबाबदार नेता म्हणून धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असल्याची राष्ट्रवादी पक्षाने या प्रकरणावरुन परिपत्रकाद्वारे आपली अधिकृत भूमिका जाहीर केली आहे. Bhujbal's Entry पक्षाने म्हटले आहे. न्याय व्यवस्था आणि कायदा यावर आमचा पूर्ण विश्वास असून त्यांच्या कामात आम्ही हस्तक्षेप करणार नसल्याचे पक्षाने म्हटले आहे. दुसरीकडे, मंत्री मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी पक्षात मोठ्या हालचालींना वेग आला आहे. धनंजय मुंडे यांच्या जागी आता छगन भुजबळ यांना मंत्री करणार का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे. Bhujbal's Entry
हेही वाचा - IND vs AUS Champions Trophy टीम इंडियाची विजयी घोडदौड ! ऑस्ट्रेलियाला धूळ चारत चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये जोरदार प्रवेश
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्याने भुजबळ नाराज होते. अनेकदा त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली. Bhujbal's Entry भुजबळांची नाराजी दूर करण्याची हीच संधी अजित पवार व पक्षाकडे असल्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचे मंत्रिपद आता भुजबळांना दिले जावू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. धनंजय मुंडे ज्या खात्याचे मंत्री होते त्या अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री म्हणून भुजबळांनी काम केलं आहे. या मुद्दावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातही प्राथमिक चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
छगन भुजबळ यांनी काय म्हटलं आहे ?दरम्यान धनंजय मुंडे Bhujbal's Entry यांच्या राजीनाम्यानंतर छगन भुजबळ यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'धनंजय मुंडेनी राजीनामा दिलेला आहे. आता या संदर्भात पक्षाची भूमिका लवकरच जाहीर होईल. पक्षाची भूमिका पहिल्यापासूनच ही होती की कोणत्याही बेकायदेशीर कृत्याला पाठीशी घालणार नाही. आमची भूमिका न्यायाचीच होती. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की, धनंजय मुंडे यांनी नैतिकतेला धरून राजीनामा दिलेला आहे.', असं छगन भुजबळ Bhujbal's Entry यांनी म्हंटलं आहे.
फक्त त्यांचा राजीनामा घेऊन चालणार नाही - आदित्य ठाकरेफक्त त्यांचा राजीनामा घेऊन चालणार नाही तर त्यांचे सरकार बरखास्त झाले पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती आपण पाहात आहेत. कुठे लहान मुलींवर अत्याचार तर कुठे महिलांवर रेप होतो. डिसेंबरमध्ये हा खून झाला आणि त्यानंतर अधिवेशन झाले. Bhujbal's Entry त्यावेळी आम्ही विरोधकांनी राजीनाम्यांची मागणी लावून धरली होती. फक्त आम्ही नाही तर भाजपाच्या आमदारांनी देखील धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती, असे शिवसेना (उबाठा) चे नेते आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. ठाकरे म्हणाले की, गेल्या अधिवेशनातच मुख्यमंत्री राजीनामा घेतील, असे आम्हाला वाटले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांचे हात नेमके कुठे बांधले होते. मैत्रीचे कारण होते की, अजून कोणते हे आम्हाला माहिती नाहीये. पण त्यांनी आम्हाला सांगितले होते की, आम्ही न्याय देऊन आणि लवकरात लवकर चाैकशी लावू. शेवटी काल अधिवेशन सुरू झाले आणि काल जे भयानक फोटो आले आणि सर्वचजण हादरून गेले. ते पाहताना देखील डोळ्यात पाणी येत होते. धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. Bhujbal's Entry
राजीनामा गेला खड्ड्यात धनंजय मुंडे यांना बडतर्फ करा - अंजली दमानियासंतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो बघितल्यानंतर रात्री मला झोप लागली नाहीये. धनंजय देशमुखने मला रात्री अडीच वाजता मेसेज केला. ताई मला हे बघवत नाहीये आणि मी काहीतरी निर्णय घेणार आहे. मला काय बोलावे हेच सुचत नाहीये. मी त्याला सकाळी फोन करून काही करू नको फक्त शांत रहा सांगितले. मुख्यमंत्री धनंजय मुंडेंना बडतर्फ का नाही करू शकत ? असाही प्रश्न , असे सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे. शासनाला अजूनही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची वाट बघायची आहे. मला कंटाळा आलाय या राजकारणाचा. भावना, संवेदना सर्व संपल्या आहेत, या राजकारण्यांच्या. त्या थर्डक्लास कराडला अजूनही व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात आहे. मुख्यमंत्र्यांना का सांगता येत नाही, हा मंत्री मला नको म्हणून, असाही प्रश्न यावेळी अंजली दमानिया यांनी उपस्थित केला. Bhujbal's Entry