मुंबई : Maharashtra Vantara गुजरातमध्ये ज्या प्रकारे वन्यप्राण्यांसाठी वनतारा उभारण्यात आले आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही प्राणीसंग्रहालय उभारण्यात यावे. त्यासाठी उद्योगपतींनी पुढाकार घ्यावा असा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविला असल्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत सांगितले. गुजरात प्रमाणे एखादे वनतारा महाराष्ट्रातही उभारा Maharashtra Vantara असे पत्र उदयोगपती अनंत अंबानी यांना लिहिणार असल्याचेही ते म्हणाले. राज्यात वाघ आणि बिबटयांमुळे मानव-प्राणी संघर्ष निर्माण होत असल्याच्या मुददयावर विधानसभेत अनेक सदस्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. त्यावर विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचे गणेश नाईक यांनी स्पष्ट केले. या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी येत्या शुक्रवारी विधानसभाध्यक्षांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले.
हल्लेखोर वाघिणीच्या बछड्यांचा कोकात सोडले
भंडारा लगतच्या कोका वन्यजीव अभयारण्याच्या बफर झोनलगत सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या एका महिलेला वाघाने हल्ला करून ठार मारल्याचा मुददा विजय वडेट्टीवार यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून Maharashtra Vantara उपस्थित केला होता. भंडारा वनविभागातील अडयाळ लाखांदूर येथील मानवी वस्तीनजीक बीटी-10 या वाघिणीचा 2 वर्षांच्या बछडयाने हा हल्ला केला आहे. त्याला जेरबंद करून भंडारा वनक्षेत्रातील कोका नियत क्षेत्रात सोडण्यात आल्याचे गणेश नाईक म्हणाले. राज्यात एकूण 61991.89 चौ.कि.मी. वनक्षेत्र असून त्याचे व्यवस्थापन करण्याकरिता एकूण 11 प्रादेशिक वनवृत्त व 2 वन्यजीव वनवृत्त आहेत. तसेच Maharashtra Vantara वन्यजीव संरक्षणाकरिता राज्यात 6 राष्ट्रीय उद्याने, 52 वन्यजीव अभयारण्ये व 28 संवर्धन राखीव क्षेत्र अधिसूचित करण्यात आली आहेत. त्यापैकी 5 राष्ट्रीय उद्याने व 15 वन्यजीव अभयारण्यांचा समावेश करुन 6 व्याघ्र प्रकल्पांची निर्मिती करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
महाराष्ट्रात 444 वाघ
सन 2000 च्या सुमारास महाराष्ट्रात Maharashtra Vantara 101 वाघ होते. आता या वाघांची संख्या वाढून 444 इतकी झाली असल्याचे गणेश नाईक म्हणाले. हिंस्त्र प्राण्यांचे भक्ष्य हे शाकाहारी प्राणी असतात. त्यांच्यात वाढ व्हावी यासाठी वनक्षेत्रात रायवळ आंबा,फणस आदी फळझाडे लावण्यास वनविभागाला सांगण्यात आल्याचेही नाईक म्हणाले.
महाराष्ट्रातही वनतारा
वाघ आदी प्राण्यांच्या संवर्धनासाठी अनंत अंबानी यांनी ज्या प्रकारे गुजरातमध्ये वनतारा प्राणीसंग्रहालय उभारले आहे त्या धर्तीवर महाराष्ट्रातही असे वनतारा Maharashtra Vantara उभारावे यासाठी त्यांना पत्र लिहिणार आहोत. त्यासाठी उदयोगपतींनी पुढाकार घ्यावा असा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविण्यात येणार असल्याचेही गणेश नाईक यांनी स्पष्ट केले.