गुरुग्राम - Social Media Friendship एका 15 वर्षीय विद्यार्थिनीला सोशल मीडियावरील मैत्रीची Social Media Friendship मोठी किंमत मोजावी लागली. एका तरुणाने तिचे पर्सनल फोटो मॉर्फ करून तिला ब्लॅकमेल केले. यानंतर भीतीपोटी मुलीने तिच्या आजीच्या बँक खात्यातून 80 लाख रुपये काढले आणि ते तरुणाच्या खात्यात ट्रान्सफर केले. फेब्रुवारी 2024 मध्ये हे सुरू झाले आणि जवळपास आठ महिने चालले. वारंवार येणाऱ्या धमक्यांमुळे मुलगी पैसे देत राहिली. पण जेव्हा खात्यातील पैसे संपले आणि ब्लॅकमेलिंग थांबले नाही तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले.
वृत्तानुसार, विद्यार्थिनीने तिच्या आजीच्या बँक खात्याचा उल्लेख शाळेतील एका मित्रासमोर केला होता. नंतर त्याच शाळेतील एका विद्यार्थ्याच्या मोठ्या भावाला याबाबत माहिती दिली. Social Media Friendship 20 वर्षीय सुमित कटारियाने सोशल मीडियावर या मुलीशी मैत्री केली आणि तिचे काही फोटो मिळवले आणि ते मॉर्फ करून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. मुलीचा फोन नंबरही मिळवला आणि धमक्या देऊ लागल्या.
सहा जणांना अटक
खात्यातील पैसे संपल्यानंतर विद्यार्थिनीला धमकावण्यास सुरुवात केली तेव्हा परिस्थिती आणखी बिकट झाली. मुलीचं वागणं पाहून शिक्षकांना संशय आला. त्यानंतर त्यांनी याबाबत कुटुंबाला माहिती दिली. Social Media Friendship कुटुंबाने तात्काळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली. डिसेंबर 2024 मध्ये तपास सुरू झाला. या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे.