मुंबई : Assembly Clash आधी औरंगाजेब आणि आता मराठीच्या मुद्यावरून अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजत असतानाच सभागृहात गुरूवारी सत्ताधाऱ्यांमध्येच टोले-टोमणे बघायला मिळाले. भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या चंद्रपूर येथील धान उत्पादक शेतकरी, भात उत्पादक शेतकरी आणि त्यांच्या पीक विम्याच्या मुद्यावरुन कृषीमंत्र्यांना घेरले. मुनगंटीवार यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्यावर निशाणा साधला. Assembly Clash विशेष म्हणजे यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी एक वक्तव्य केले. आपण चुकून एकदा मंत्री झालो होतो. काही वर्ष मंत्री राहिलो होतो, असे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपा आमदार आशिष शेलार यांनी आक्षेप घेतला. विशेष म्हणजे काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनीही संधी मिळताच टोमणा मारला.
काय म्हणाले मुनगंटीवार ?
पीकविमा लागूच होऊ शकत नाही कारण शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई संदर्भात अर्ज केलेला नाही. काहीच केलेले नाही. आता दोन मुद्दे आहेत. मंत्री महोदय पीक विमा 1 रुपयात द्या किंवा 10 रुपयांत द्या किंवा पहिल्याचा काळातील 1 ताब्यांच्या पैशात द्या. याचा संबंध पीक विम्यात येत नाही. आता हा जीआर. तुम्ही वकील आहात. असे का वागलात ? चुकून मीही काही वर्ष वकील होतो. Assembly Clash थोडसे मलाही समजतं. पण अहो तुम्ही शेतकऱ्यांवर अन्याय कसा करणार? हा जीआर आहे. तुम्ही वकील आहात, मंत्रीही वकील आहेत आणि मी सुद्धा रजिस्ट्रेशन केलेले आहे पण एलएलबी आहे. तीनही जीआर आहेत. तुम्ही सांगता विमा देऊ, असे मुनगंटीवार म्हणाले.
जनाधाराने ठरवून मंत्री होते
यावर आशिष शेलार म्हणाले, सुधीरभाऊंच्या प्रश्नाला मी कधीच क्रॉस करु शकत नाही. करणारही नाही. पण रेकॉर्डवर चुकीचे जाऊ नये. ते असे म्हणाले की, मी चुकून मंत्री होतो. ते चुकून मंत्री नव्हते. Assembly Clash मंत्रिमंडळाने ठरवून मंत्री होते. जनाधाराने ठरवून मंत्री होते. त्यांचा आम्हाला अभिमान होता आणि आहे. रेकॉर्डवरुन तेवढे वाक्य काढावे, अशी विनंतीही त्यांनी केली.
आता ते चुकून बाहेर -पटोले
सुधीर मुनगंटीवार भात उत्पादकांवर नुकसान होऊ देऊ नका, असे सांगत असताना काँग्रेस नेते नाना पटोले यांनी टोमणा मारला. अध्यक्ष महोदय, ते चुकून मंत्री होते Assembly Clash . मग आता चुकून बाहेर राहीले?, असा खोचक टोला पटोले यांनी लगावला. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, आता मी चुकून ही चर्चा घडवून आणली, असे वाटू देऊ नका. असे म्हणत विधानसभा अध्यक्षांनी विषय समोर नेला.
आमच्या भावना धान उत्पादकांच्या बाजूने - जयस्वाल
यादरम्यान, मंत्री आशिष जयस्वाल म्हणाले, सुधीर मुनगंटीवार यांना सर्व विषयांचा अभ्यास आहे. त्यांना अतिरिक्त सांगायची गरज नाही. ते सुद्धा धान उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करतो. मी सुद्धा प्रतिनिधित्व करतो. Assembly Clash आमच्या सर्वांच्या भावना धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. म्हणून सरकारने खरेदी केंद्रात धान दिला असो किंवा नसो.