नागपूर : खुल्या सार्वजनिक विहिरीत Well Accident Nagpur पडल्याने मुलाचा मृत्यू झाल्यानंतर नुकसान भरपाईसाठी मातेने प्रथम महापालिकेकडे अर्ज केला. मात्र काही निष्पन्न न झाल्याने न्याय देण्याची विनंती उच्च न्यायालयाला केली. आशा भगत असे या मातेचे नाव असून, सुनावणीनंतर उच्च न्यायालयाने प्रथम 2.50 लाख रुपयांची एक्स-ग्रेशिया रक्कम न्यायालयात जमा करण्याचे आदेश महापालिकेला दिले. महापालिकेच्या वतीने आठवडाभरात ही रक्कम जमा करण्याचे आश्वासन देण्यात आले. यावर याचिकाकर्त्यांच्या वतीने कोणताही आक्षेप नोंदविण्यात आला नाही. त्यानंतर उच्च न्यायालयाने सुनावणी तहकूब केली. याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. शिल्पा गिरटकर आणि महापालिकेच्या वतीने अॅड. अभय सांबरे यांनी बाजू मांडली. याचिकाकर्त्या मातेचा मुलगा प्रशांत भगत हा सिव्हिल लाइन्स येथील उपमहा लेखा कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत होता. 4 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 9.30 वाजता फिरायला गेला. मात्र रात्री तो घरी परतला नाही, असे याचिकेत नमूद आहे.
मुख्यमंत्री कार्यालयालाही मागितली भरपाईची
याचिकेत म्हटले आहे की, दुस-या दिवशी सकाळी याचिकाकर्ती माता दुस-या मुलासोबत प्रशांतच्या शोधार्थ घराबाहेर पडली. तो कुठेही न सापडल्याने त्यांनी कपिलनगर पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. आठ वाजताच्या सुमारास कपिलनगर पोलिसांनी विहिरीत एका मृतदेह सापडल्याची माहिती भगत कुटुंबाला दिली. तपासाअंती प्रशांतची ओळख पटली. ऑटोमोटिव्ह चौक ते नुरी मशीद दरम्यान अंधारामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या उघड्या विहिरीत Well Accident Nagpur पडून त्याचा मृत्यू झाला. 20 फेब्रुवारी 2023 रोजी महानगर पालिका आयुक्तांव्यतिरिक्त आसीनगर झोनचे सहाय्यक आयुक्त आणि मुख्यमंत्री कार्यालयाच्या सचिवालयालाही नुकसान भरपाईची मागणी करणारे पत्र देण्यात आले होते.
महापालिकेत भरपाई योजना नाही
याचिकाकर्त्याच्या वतीने सांगण्यात आले की, अपघाती मृत्यू अंतर्गत नुकसान भरपाईसाठी सरकारी विभागांमध्ये धोरण Well Accident Nagpur आहे. मात्र या प्रकरणात पीडितेच्या कुटुंबाला कोणतीही भरपाई देण्यात आली नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागला. रस्त्याच्या कडेला असलेल्या सार्वजनिक विहिरीत पडून याचिकाकर्त्याचा मृत्यू झाला. मृतकाच्या मातेला मृत्यूच्या दिवसापासून 9 टक्के व्याज आणि 20 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश महापालिकेला द्यावेत, अशी विनंती याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आली. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने सांगितले की, प्रतिवादींच्या कथित निष्काळजीपणामुळे झालेल्या दुखापती किंवा जीवितहानीसाठी नुकसान भरपाईचा दावा करणा-यांना पीडितांना भरपाई देण्याची कोणतीही योजना नाही Well Accident Nagpur. त्यामुळे याचिकाकर्त्याने केलेल्या अर्जावर 20 फेब्रुवारी 2023 रोजी निर्णय घेऊन त्याची माहिती 2 आठवड्यांत न्यायालयात सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. तोपर्यंत अडीच लाख रुपये न्यायालयात जमा करण्याचे आदेश महापालिकेला देण्यात आले.