नाशिक : Kirit Somaiya on Bangladeshis देशभरात अवैधरित्या भारतात घुसलेल्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध कारवाई सुरु करण्यात आली आहे. अशातच भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा बांगलादेशीच्या शोधाचा मोर्चा Kirit Somaiya on Bangladeshis आता मालेगावनंतर नाशिककडे वळला आहे. नाशिकच्या कळवणमध्ये पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेमध्ये बांगलादेशी लाभार्थी असल्याचा संशय भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये 181 बांगलादेशी असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.
याच पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या हे कळवण कृषी कार्यालय आणि पोलिस ठाण्याला भेट देणार आहेत. यावेळी नाशिकच्या पोलिस महानिरीक्षकांचीही ते भेट घेणार आहेत. नाशिकच्या कळवळ येथे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेमध्ये 181 बोगस लाभार्थी बांगलादेशी Kirit Somaiya on Bangladeshis असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला. किरीट सोमय्या यांनी एक्स पोस्ट करत याची माहिती दिली. आता बांगलादेशी लाभार्थी ? आज कळवण आणि नाशिक दौरा गाव भादवण, तालुका कळवण, जिल्हा नाशिक येथे प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना मध्ये 181 बोगस बांगलादेशी लाभार्थी Kirit Somaiya on Bangladeshis, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले. यासह किरीट सोमय्या यांनी बोगस लाभार्थ्यांची यादीदेखील पोस्ट केली आहे.