Numerology आपल्या दैनंदिन जीवनात आपण सतत वेगवेगळ्या संख्यांशी (Numbers) जोडलेले असतो. मग ती आपली जन्मतारीख, मोबाइल नंबर, वाहन क्रमांक, घराचा पत्ता, बँक खात्याचा क्रमांक असा बराच काही असू शकत. परंतु, हे नंबर केवळ गणित मांडण्यासाठी उपयोगात येत नसून आपल्या जीवनावर त्याचा प्रत्यक्ष परिणाम करणारी ऊर्जा वाहक असतात. न्यूमेरोलॉजी म्हणजेच अंकशास्त्राच्या Numerology मदतीने आपण या संख्यांचे अर्थ समजून घेऊ शकतो आणि त्यांच्या साथीने जीवनातील सकारात्मक बदल घडवू शकतो.
संख्यांचे जीवनावर होणारे परिणाम
Numerology प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक प्रमुख नंबर ज्याला आपण (Driver Number) आणि दुसरा सहाय्यक नंबर (Conductor Number) असतो. ड्रायव्हर नंबर व्यक्तीच्या स्वभावाची, वैयक्तिक गुणधर्मांची आणि निर्णय क्षमतेची ओळख करून देतो. तर कंडक्टर नंबर जीवनात योग्य दिशा मिळवण्यात मदत करतो. या दोन नंबरच्या प्रभावामुळे जीवनातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी ठरतात.
आपल्या आजूबाजूलाच असे अनेक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात. काही व्यक्तींना व्यवसायात अचानक यश मिळते, काहींच्या नातेसंबंधांमध्ये सतत अडथळे येतात, काही जण आर्थिक संकटात सापडतात तर काहींचे आरोग्य कायम अस्थिर राहते. यामागे त्यांच्या जन्मतारखेशी आणि संख्यांच्या ऊर्जेशी असलेला संबंध कारणीभूत असतात.
संख्यांची सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा
प्रत्येक संख्येची Numerology स्वतःची अशी ऊर्जा असते. ही ऊर्जा सकारात्मक (Positive) किंवा नकारात्मक (Negative) अशी दोन्ही प्रकारची असू शकते. जर एखाद्या व्यक्तीला तिच्या मूलांकानुसार (Life Path Number) योग्य ऊर्जा म्हणजेच सकारात्मक (Positive) मिळत असेल, तर तिच्या जीवनातील गोष्टी सहजगत्या घडतात. परंतु, नकारात्मक ऊर्जा असेल, तर अडथळे, अपयश आणि अशांतता अनुभवायला मिळते.
संख्यांचे काही प्रभाव :
१) १, ३, ५, ६ आणि ९ हे नंबर सकारात्मक ऊर्जा वाढवतात.
२) २, ४, ७ आणि ८ हे सावधगिरीने वापरण्याचे नंबर असतात.
३) एंजल नंबर (Angel Numbers) जसे की 111, 222, 333, 777 यांचा विशिष्ट मार्गदर्शक संदेश असतो.
ऑरा आणि ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व
प्रत्येक व्यक्तीभोवती एक अदृश्य असे ऊर्जा क्षेत्र असते ज्याला ऑरा (Aura) म्हटल्या जात. जे तिच्या मानसिक, शारीरिक आणि भावनिक स्थितीचे प्रतिबिंब असते. न्यूमेरोलॉजीमध्ये Numerology या ऑराचे निरीक्षण करून व्यक्तीला योग्य नंबर आणि उपाय सांगता येतात. ऑरा सकारात्मक असेल, तर व्यक्तीचे स्वास्थ्य, संपत्ती आणि नातेसंबंध चांगले राहतात. म्हणजे सगळंच आलबेल असत. जर ऑरा नकारात्मक असेल, तर आर्थिक अडचणी, मानसिक तणाव आणि अपयश यासारख्या समस्या जाणवतात आणि सतत संघर्ष करावा लागतो.
संख्या द्वारे जीवनात संतुलन कसे साधावे ?
Numerology संख्यांच्या योग्य वापराने जीवन अधिक सकारात्मक आणि समृद्ध बनवता येते. त्यासाठी काही सोपे उपाय करता येतात :
१) जन्मतारखेनुसार योग्य रंग वापरणे.
२) घरातील वास्तुशी सुसंगत संख्यांचा समावेश करणे.
३) चांगली ऊर्जा टिकवण्यासाठी सकारात्मक संख्यांचे जप करणे.
४) मॅनिफेस्टेशन आणि ध्यानसाधनेच्या माध्यमातून योग्य ऊर्जेला आकर्षित करणे.
संख्यांचे विज्ञान आणि भविष्यातील दिशादर्शन
न्यूमेरोलॉजी Numerology ही कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा नसून ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यासलेली ऊर्जा प्रणाली आहे. योग्य नंबर ओळखल्यास जीवनात अधिक समतोल, यश आणि आनंद मिळू शकतो. त्यामुळे संख्यांचे गूढ उलगडून, योग्य दिशेने वाटचाल करणे आपल्याच हाती आहे.
डॉ. आभा जैन - न्यूमरोलॉजिस्ट