Wadettiwar High Court Notice वडेट्टीवारांना हादरा ! उच्च न्यायालयाची नोटीस, भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

08 Mar 2025 17:52:25

wade
 
नागपूर : Wadettiwar High Court Notice काँग्रेसचे गटनेते ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या विजयाला आव्हान देणारी याचिका या मतदारसंघातील पराभूत उमेदवार नारायण जांभूळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली आहे. याचिकेची न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांच्या खंडपीठासमक्ष सुनावणी झाली. खंडपीठाने वडेट्टीवार यांना नोटीस बजावत Wadettiwar High Court Notice दोन आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले. 
 
 
विजय वडेट्टीवार यांनी दाखल केलेले शपथपत्र अवैध असून Wadettiwar High Court Notice, त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी विनंती याचिकेतून करण्यात आली आहे. निवडणुकीचा अर्ज दाखल करतेवेळी वडेट्टीवार यांनी शपथपत्रासाठी मुद्रांक प्रमाणपत्र त्यांच्या पत्नीच्या नावे होते. त्यामुळे मुद्रांक कायद्यानुसार त्यांचे प्रतिज्ञापत्र अवैध आहे. हा मुद्रांक पेपर करारनाम्यासाठी खरेदी करण्यात आला होता मात्र, त्याचा उपयोग शपथपत्रासाठी करण्यात आला. त्यामुळे वडेट्टीवार यांची निवडणूक अवैध ठरवून रद्द करण्यात Wadettiwar High Court Notice यावी, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0