मुंबई : Free Electricity For Agricultural Pumps बळीराजा मोफत वीज योजनेच्या माध्यमातून ४५ लाख कृषीपंपांना मोफत वीज देण्यात येते. या माध्यमातून १६ हजार मेगावॅट वीज देणारे महाराष्ट्र एकमेव राज्य आहे. या फीडरचेही पूर्ण सोलरायझेशन करण्यात येत असून डिसेंबर २०२६ पर्यंत कृषीपंपांना शंभर टक्के वीज सोलरच्या माध्यमातून Free Electricity For Agricultural Pumps दिली जाईल. तसेच १०० युनिट पर्यंत वीज वापरणारे राज्यात ७० टक्के म्हणजे दीड कोटी ग्राहक आहेत. त्यांच्यासाठी देखील सोलर योजना आणत आहोत. त्यामुळे या दीड कोटी वीजग्राहकांची देखील वीजबीलातून मुक्तता Free Electricity For Agricultural Pumps होणार आहे. दरवर्षी वीजेचे दर ९ टक्क्यांनी वाढत असतात. मात्र यावेळी पहिल्यांदाच त्यात घट होणार आहे. १०० युनिटपर्यंतच्या ग्राहकांना २४ टक्क्यांची तर १०० ते ३०० युनिट वापरकर्त्यांना १७ टक्क्यांची वीजबील घट येणार Free Electricity For Agricultural Pumps असल्याची महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. लवकरच वीज कंपनी स्टॉक मार्केटमध्ये देखील लिस्टेड होणार असल्याचेही ते म्हणाले.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. राज्याची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलर पर्यंत न्यायची असेल तर राज्याला मोठया प्रमाणात वीजेची गरज लागणार आहे. महाराष्ट्र हे देशाचे डेटा सेंटर कॅपिटल बनणार आहे. डेटा सेंटरला वीज हीच प्रामुख्याने लागणार आहे. त्यासाठी सर्व ती तयारी करण्यात आल्याचे सांगून Free Electricity For Agricultural Pumps मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून २० लाख घरे देण्यात येणार आहेत. ही सर्व घरे सोलर पॅनेलने युक्त असतील. त्यामुळे या वीस लाख घरांची देखील वीजबीलातून मुक्ती होणार आहे.
डिसेंबर २०२६ पर्यंत कृषीपंप हे सोलरवर चालतील. त्यामुळे शेतक-यांना देखील वर्षाचे ३६५ दिवस ते ही दिवसा वीज मिळणार आहे. एकूण वीज खरेदीत सरकारची १० हजार कोटींची बचत होणार असून कार्बन उत्सर्जनात २५ टक्क्यांची कपात होणार आहे. २०३० सालापर्यंत ५२ टक्के वीज ही अपारंपारिक उर्जा स्त्रोतातून निर्मित करण्यात येणार आहे. घरगुती ग्राहकांनी देखील जर स्मार्ट मीटर बसविले तर पुढील पाच वर्षांत त्यांना दिवसा वापरण्यात येणा-या वीजेवर १० टक्के रिबेट देण्यात येणार आहे. मात्र प्रीपेड मीटरची सक्ती अजिबात Free Electricity For Agricultural Pumps करण्यात येणार नाही,फक्त जो मागेल त्यालाच प्रीपेड मीटर देण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
सोयाबीनची विक्रमी खरेदी
राज्यात यावर्षी ११ लाख २१ हजार ३८५ मे.टन सोयाबीनची विक्रमी खरेदी झाली आहे. इतर राज्यांच्या एकत्रित खरेदीपेक्षाही महाराष्ट्राची खरेदी १२८ टक्क्यांनी जास्त आहे. तूर खरेदीसाठी एकही गोडाउन उरलेले नव्हते. शेवटी भाडयाने गोडाउन घेउन हमीभावाने तूर खरेदी सुरू करण्यात आल्याचेही फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी जलयुक्त शिवार २.० तसेच नदीजोड योजना सुरू करण्यात आली आहे. ३१ नवीन धरणे, ६ धरणांची उंचीवाढ, ४२६ किमीचे नवीन कालवे बांधण्यात येत आहेत. यामुळे संपूर्ण विदर्भाचेही चित्र बदलणार आहे. मराठवाडयातही मोठया प्रमाणात सिंचन आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध Free Electricity For Agricultural Pumps होणार आहे. उत्तर महाराष्ट्र,नाशिक, संभाजीनगर हे पाण्यासाठीचे वाद पूर्णपणे बंद होणार आहेत. कोयना धरणातूनही वाहून जाणारे पाणी लवादाच्या अटींना हात न लावता कोकणात कसे वापरता येईल याचाही अभ्यास करतो आहोत. राज्यातला खारपाणपटटा बंद व्हावा यासाठी मध्यप्रदेश सरकारसोबतही लवकरच करार करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
शक्तीपीठ महामार्ग
शक्तीपीठ महामार्ग हा महत्वाकांक्षी मार्ग वर्धा सेवाग्राममधून सुरू होणार आहे. वर्धा यवतमाळ ते कोल्हापूर अशा १२ जिल्हयांतून हा जाणार आहे. महाराज्यातील प्रमुख भक्तीस्थळे या माध्यमातून जोडण्यात येणार आहेत. हा केवळ पर्यटनासाठी नसून मराठवाडयाचा यामुळे वेगाने औदयोगिक आणि आर्थिक विकास Free Electricity For Agricultural Pumps होणार आहे. कोल्हापूरमध्ये काहींचा या मार्गाला विरोध होता. मात्र कालच मी कोल्हापूरला गेलो होतो. तेव्हा तेथील २०० शेतक-यांनी माझी भेट घेउन हा महामार्ग हवा असल्याचे १ हजार शेतक-यांचे निवेदन मला दिल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
खड्डेमुक्त मुंबई, गावातील रस्ताही काँक्रीटचा
मुंबईतील सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. २०२७ पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. पण गावातील रस्तेही खराब होत असतात. त्यामुळे आता १ हजार लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असणा-या ४ हजार गावांना जाणारे रस्तेही काँक्रीटचे करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. ठाणे ते भिवंडी या मार्गीकेचे ८० टक्के भौतिक काम पूर्ण झाले आहे. मात्र कल्याण ते भिवंडी या टप्प्यातील ५ किमी मार्गातील बाधितांचे मोठ्या प्रमाणात पुनर्वसन करावे Free Electricity For Agricultural Pumps लागणार आहे. या टप्प्यातून मेट्रो जमिनीखालून नेण्याचे निश्चित झाले आहे. यासंदर्भातल्या अहवालाचे काम टीसीएल कंपनीला दिले आहे. प्रकल्प अहवाल आल्यानंतर हे काम वेगाने केले जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
कंत्राटदारांचे पैसे मिळणार
राज्यात निवडणूका असल्याने कंत्राटदारांचे दोन तीन महिन्यांचे पैसे रखडले होते. मात्र आता अजितदादांनी यात पुढाकार घेतला आहे. पुरवणी मागण्या तसेच अर्थसंकल्पातील निधीतून कंत्राटदारांचे पैसे लवकरच देण्यात येणार असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या कालावधीला ५ महिन्यांची मुदतवाढ
युवकांना कार्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या कालावधीस पूर्वी ६ महिने इतकी मर्यादा होती. आता हा कालावधी ५ महिन्यांनी वाढवून एकूण कालावधी ११ महिने करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यापुढे या कालावधीसाठी कोणतीही वाढ केली जाणार नाही. कारण ही योजना कायमस्वरूपी नोकरीसाठी नसून प्रशिक्षणपर आहे Free Electricity For Agricultural Pumps . अनेक तरुण या संधीची वाट पाहत आहेत, त्यामुळे प्रत्येकाला संधी मिळावी, हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे फडणवीस म्हणाले.