नागपूर : Bulldozer Justice छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करीत इतिहासतज्ज्ञ इंद्रजित सावंत यांना धमकावल्याप्रकरणी अटक झालेला प्रशांत कोरटकरविरूध्द सरकारने कठोर कारवाई करावी अपेक्षित आहे. राज्य सरकारने सोमवारी नागपूर हिंसाचारातील आरोपींच्या घरावर तातडीने बुलडोझर Bulldozer Justice चालविला. तसाच बुलडोझर कोरटकर Bulldozer Justice याच्या घरावर चालवावा अशी मागणी राजे मुधोजी भोसले यांनी केली. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी ही अपेक्षा व्यक्त केली.
हिंसाचाराच्या घटनेतील Bulldozer Justice आरोपीच्या घरावर सरकारने ज्या घाईने कारवाई केली, तशीच कारवाई कोरटकरांच्या घरावर होणे अत्यावश्यक असल्याचे राजे मुधोजी भोसले म्हणाले. महिनाभरानंतर अटक झाल्याने आता तो सुटणार नाही, ही जबाबदारी सरकारची आहे. तो कुणाच्या मदतीने व सहकार्याने एवढे दिवस फरार होता, ही सर्व चौकशी व्हावी. तसेच, यापुढे तसे धाडस करणार नाही, याची तजवीजही सरकारने करणे अपेक्षित असल्याचे राजे म्हणाले.
दरम्यान, कोरटकराच्या Bulldozer Justice अटकेनंतर अनेकजण चौकशीच्या फेऱ्यात येणार आहे. मुंबई ते नागपूर अशी चौकशी असेल. नागपुरातही कोरटकरांशी संबंधित अनेक जणांची चौकशी होऊ शकते. राजकारणातील अनेकांसोबत त्याचे छायाचित्र आहे. त्यामुळे आता कोरटकराविरूध्द सरकारतर्फे कशी कारवाई केली जाते, याकडेही अनेकांच्या नजरा राहणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषा वापरल्याबद्दल कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सूत्रांनुसार, कोरटकरला तुरुंगातील अंडा सेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. नागपूर निवासी कोरटकरला 24 मार्चला अटक करण्यात आली. रविवारी, त्याच्या पोलिस कोठडीचा कालावधी संपल्यानंतर त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी कोरटकरला पुढील कोठडीसाठी फार जोर न दिल्याने न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. सुरक्षेच्या कारणास्तव, त्याला कोल्हापूरच्या कळंबा तुरुंगात वेगळ्या कक्षात ठेवण्यात येईल, असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. स्वतंत्र कक्ष म्हणजे अंडा सेल स्थापित केला जात आहे.
त्याला वकिलाने केली होती मारहाण
24 मार्चला न्यायालयाच्या आवारातून बाहेर काढताना कोरटकरला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले होते. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव अधिकाऱ्यांनी त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय 28 मार्चला एका वकिलाने त्याला शिविगाळ करत मारहाण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिसांनी कोरटकरवर कोणताही शारीरिक हल्ला झाला नाही, असे स्पष्ट केले होते. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकावल्याप्रकरणी कोरटकरविरुद्ध 26 फेब्रुवारीला गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर 24 मार्चला त्याला तेलंगणातून अटक करण्यात आली.
अंडा सेलमध्ये सहसा विजेची सुविधा नसते, कैद्यांना अंधारात ठेवले जाते. सुविधांच्या नावाखाली कैद्यांना झोपण्यासाठी फक्त एकच बेड दिला जातो. कोठडीच्या बाहेर विद्युत कुंपण आहे. आत आणि बाहेर सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. कोणत्याही तुरुंगाचा सर्वात सुरक्षित भाग म्हणजे अंडा सेल.