नागपूर / मुंबई : RSS Warning on Aurangzeb क्रूरकर्मा मुघल सम्राट औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अतिउत्साही नेत्यांना फटकारले आहे. संघाचे माजी सरकार्यवाह सुरेश 'भैयाजी' जोशी म्हणाले की, हा मुद्दा अनावश्यकपणे उपस्थित करण्यात आला आहे. ज्याची श्रद्धा आहे, तो छत्रपती संभाजीनगर येथील त्याच्या थडग्याला भेट देईल, असे नागपूरमधील एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जोशी म्हणाले.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या टिप्पण्या आणि औरंगजेबाच्या थडग्याच्या मुद्द्याबद्दल विचारले असता जोशी म्हणाले की, औरंगजेबाच्या थडग्याचा मुद्दा RSS Warning on Aurangzeb अनावश्यकपणे उपस्थित करण्यात आला आहे. त्याचे निधन तेथे झाले, म्हणून तेथे त्याची कबरी बांधण्यात आली आहे. ज्यांचा विश्वास आहे ते तिथे जातील. जोशी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण देत सांगितले की, त्यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाची कबर बनवली होती. त्यांनी स्पष्ट केले की औरंगजेबाचा मृत्यू RSS Warning on Aurangzeb इथे झाल्याने त्याची कबर इथे बांधली गेली. हे भारताच्या उदारता आणि समावेशकतेचे प्रतीक आहे.
देवेंद्र फडणवीस - कबरीचे उदात्तीकरण नको
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, औरंगजेबाची कबर ही संरक्षित स्मारक आहे. पण कोणालाही त्याचे उदात्तीकरण करण्याची परवानगी दिली जाणार नाही. नागपुरात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, कायद्याच्या कक्षेबाहेर असलेल्या संरचना काढून टाकल्या पाहिजेत. औरंगजेब आवडो किंवा न आवडो, त्याची कबर एक संरक्षित स्मारक RSS Warning on Aurangzeb आहे. अशा परिस्थितीत, आपल्याला इच्छा नसली तरी त्याचे संरक्षण करावे लागेल.
राज ठाकरे यांनी उपस्थित केला मुद्दा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी औरंगजेबाच्या थडग्यावरून RSS Warning on Aurangzeb जातीय तणाव निर्माण करण्याच्या प्रयत्नांचा निषेध केला आणि इतिहासाकडे जात व धर्माच्या चष्म्यातून पाहू नये असे म्हटले. त्यांनी लोकांना ऐतिहासिक माहितीसाठी व्हॉट्सअॅप फॉरवर्डवर अवलंबून राहू नका असे आवाहन केले. राज ठाकरे म्हणाले की, मुघल शासक 'शिवाजी नावाच्या विचाराला मारू इच्छित होता' पण तो अयशस्वी झाला आणि त्याचा महाराष्ट्रात मृत्यू झाला. मनसे प्रमुखांनी म्हटले होते की, विजापूरचा सेनापती अफजल खान याला प्रतापगड किल्ल्याजवळ दफन करण्यात आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या परवानगीशिवाय हे करता आले नसते.
शिंदे गटात मतभेद
औरंगजेबाच्या कबरीवरून शिंदे गटामध्येच मतभेद असल्याचे दिसून येत आहे. औरंगजेबाची कबर तिथे नको, अशी भूमिका संजय शिरसाट यांनी घेतली आहे. मात्र, शंभूराज देसाई यांचे वेगळेच म्हणणे आहे. कबर तिथेच राहु द्या, पण तिचे उदात्तीकरण व्हायला नको, असे शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे.
संघाची भूमिका काही असू शकते. त्यांच्या भूमिकेला आम्ही विरोध करत नाही. संघाची भूमिका काही असली, तरी आमची भूमिका कबर नको अशी ठाम आहे, असे संजय शिरसाट म्हणाले. तर, औरंगजेबाच्या कबरीला धार्मिक स्थळाचा दर्जा देऊ नये. त्या ठिकाणी कोणते मोठे बांधकाम होता कामा नये. राज ठाकरे म्हणतात, त्याप्रमाणे तिथे मोठा बोर्ड लावण्यात यावा. औरंगजेबाचा अंत कसा झाला, हे पुढील पिढ्यांना समजले पाहिजे. यासाठी राज ठाकरे जे म्हणाले ते योग्य आहे, असे देसाई म्हणाले.