अमरोहा (उत्तर प्रदेश) : ( Marriage after two divorces ) मेरठच्या एकाशी शिवानीने पहिले केले होते, परंतु घटस्फोट झाला पुढे 2011 मध्ये अपघातात अपंग झालेल्या सैदनवाली येथील तौफिकशी तिने लग्न केले. अलिकडे तिचे बारावीच्या विद्यार्थ्याशी सूत जुळले आणि गेल्या शुक्रवारी तौफिकला घटस्फोट देऊन शबनमने हिंदू धर्म ( Marriage after two divorces ) स्वीकारला. विशेष म्हणजे ज्या शिवा नावाच्या मुलाशी तिने लग्न केले आहे.
तीन मुलांची आई असलेल्या 30 वर्षीय महिलेने धर्म बदलून 12 वीत शिकणाऱ्या 18 वर्षीय मुलाशी तिसरे लग्न केल्याची घटना उत्तरप्रदेशातील अमरोहा येथे घडली. आधीची शबनम लग्नानंतर आता शिवानी झाली असून, बुधवारी रीतसर हिंदू धर्म स्वीकारून तिने हे लग्न केले आहे. हसनपूरचे पोलिस अधिकारी दीपकुमार पंत यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. शिवाचे वडील दाताराम सिंग यांनी या लग्नाला पाठिंबा दिला आहे. नवविवाहित जोडप्याने सुखाने संसार करावा एवढीच आमची अपेक्षा आहे, असे दाताराम यांनी म्हटले आहे.