Real Hanuman Darshan : कोण आहेत ते सौभाग्यशाली ? ज्यांना लाभले साक्षात हनुमानाचे दर्शन 

10 Apr 2025 11:20:25

hanuman
 
अमरत्वाचे ( Real Hanuman Darshan ) वरदान लाभलेल्या हनुमंताने कुणाकुणाला दर्शन दिले याची काही प्रसिद्ध उदाहरणे आपल्याला लहानपणापासून सांगण्यात आली आहेत. यात संत तुलसीदासांना हनुमानजींनी प्रत्यक्ष दर्शन ( Real Hanuman Darshan ) दिल्याचे सांगितले जाते. त्यांच्या मार्गदर्शनानेच तुलसीदासांनी रामचरितमानस लिहिले. अनेक संतांनी, विशेषतः रामभक्त संतांनी, हनुमानजींचं स्वप्नदर्शन किंवा ध्यानात दर्शन ( Real Hanuman Darshan ) घेतलं आहे. रामदास स्वामी, श्री स्वामी समर्थ, त्यागराज, राघवेंद्र स्वामी यांचेही नाव या यादीत घेतले जाते. काही भक्त सांगतात की, काही वेळा वृद्ध वानररूपात, किंवा अनाम साधूच्या रूपात हनुमानजी येतात आणि नंतर अदृश्य होतात. हनुमानजींचे दर्शन ( Real Hanuman Darshan ) भक्तांच्या श्रद्धेवर आणि मनाच्या पवित्रतेवर अवलंबून असते. ते अनेकदा स्वप्नांतून, ध्यानात, संकटातून सुटका करून, किंवा अनपेक्षित कृपा रूपात दर्शन देतात.
 
काही वेळा आपल्याला कोणी साधू, वृद्ध, वा अनोळखी व्यक्ती मदत करतो आणि नंतर अदृश्य होतो. अशा गोष्टींना भक्त हनुमंताचा आशीर्वाद मानतात. सात्त्विक जीवनशैली, रामभक्ती आणि हनुमान चालीसा पठण, सेवा, त्याग आणि विनम्रता, अहंकाराचा त्याग, नित्य ध्यान आणि जप करणाऱ्याला हनुमंताचे दर्शन घडते अशी हिंदू समाजात मान्यता आहे.
 
  
कलीयुगात हनुमानाने दर्शन कुणाला घडले
 
१. तुलसीदासजी (१५व्या शतकात) - एकदा तुलसीदास काशीमध्ये रामनामाचा प्रचार करत होते. काही लोकांनी त्यांचा उपहास केला. त्यावेळी एक वृद्ध वानररूप साधू त्यांना भेटला आणि 'तू श्रीरामाचे कार्य करतो आहेस, तुला त्यांचे साक्षात दर्शन मिळेल' असे सांगितले. तोच हनुमान होता असे मानले जाते. पुढे तुलसीदासांनी चित्रकूटात श्रीरामाचे प्रत्यक्ष दर्शन घेतले.
 
२. श्रीरामदास स्वामी (महाराष्ट्र, १६व्या शतकात) - समर्थ रामदास स्वामींच्या आयुष्यातही हनुमानजींनी अनेकदा अनोख्या स्वरूपात मदत केली. एका कथेप्रमाणे, एकदा ते वनात हरवले होते, तेव्हा एक बलाढ्य वानर त्यांना मार्ग दाखवून घेऊन गेला. पुढे त्यानेच आपले अस्तित्व अदृश्य केले.

3 श्री स्वामी समर्थ (अक्कलकोट) - स्वामी समर्थ यांच्याकडे आलेल्या एका भक्ताने विचारले, हनुमानजी खरंच अस्तित्वात आहेत का ?, स्वामींनी शांतपणे सांगितले – अरे, आत्ता मंदिरात बसले आहेत. जाऊन नमस्कार कर. तो भक्त मंदिरात गेला आणि त्याला वानरसदृश एक तेजस्वी आकृती दिसली… काही क्षणात ती गायब झाली.
 
४. रामभक्त संत त्यागराज (दक्षिण भारत) - त्यागराज रोज रामनाम संकीर्तन करत असत. एका दिवसाला एक वृद्ध साधू त्यांच्याकडे आला, आणि त्यांना रामभक्तीबद्दल विचारले. त्यागराज म्हणाले, 'राम नामाशिवाय जीवन शून्य आहे.' त्या वृद्धाने आशीर्वाद देऊन अंतर्धान घेतले, ते हनुमानजी होते, असे सांगितले जाते.
Powered By Sangraha 9.0