Forest Minister Ganesh Naik : वनमंत्री नाईकांचे नवे मिशन ! पडीक जमिनीत फळबागांची समृद्धी

Top Trending News    11-Apr-2025
Total Views |
 
forest
 
नागपूर : ( Forest Minister Ganesh Naik ) कोकणातील शेतक-यांनी पारंपरिक शेतीला बगल देत सुरंगीच्या लागवडीने अर्थकारणात लक्षणीय बदल घडवून आणले. या वनस्पतीला स्थानिक बाजारपेठेत मोठी किंमत असून फुलांपासून सुगंधित द्रव्ये तयार करता येते. समृद्धी महामार्गाच्या दुतर्फा या झाडांची लागवड करण्यात येईल, असे वनमंत्री गणेश नाईक ( Forest Minister Ganesh Naik ) यांनी नागपुरात सांगितले. वन विभागाच्या पडीक जमिनीवर फळबागांची लागवड व प्रक्रिया केंद्रे उभारण्याच्या तसेच खडकाळ जमिनीवर सौर उर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून वनविभागाला आर्थिक बळकटी देण्याचा प्रयत्न आहे. कोकणात आंबा, पश्चिम महाराष्ट्रात डाळिंब, मराठवाड्यात मोसंबी तर विदर्भात संत्रा लागवडीचे नियोजन असून, या माध्यमातून रोजगाराला चालना देण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
 
 
वनमंत्री गणेश नाईक ( Forest Minister Ganesh Naik ) म्हणाले, व्याघ्र मृत्यूच्या घटनांबाबत व्यवस्थापनाला सतर्क राहण्याचा सल्ला दिला. वनक्षेत्रातून जाणा-या रेल्वे गाड्यांच्या गतीवर नियंत्रण यावे, यासाठी रेल्वेशी पत्रव्यवहार करणार असल्याचे ते म्हणाले. 19 वाघांची शिकार करणाऱ्या बहेलिया टोळीबाबत तपास सुरू असून लवकरच चार्जशीट दाखल करण्यात येईल. या टोळी मागे आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांचा सहभागही तपासण्यात येत असल्याचे नाईक म्हणाले. कॅम्पामधील 3 हजार कोटींच्या निधीतून वन विभागाचे बळकटीकरण केले जाऊ शकते. यंत्रसामग्रीसह वणवा विझविण्यासाठी 50 लाखांचे ड्रोन, आवश्यक असल्यास चॉपर खरेदीही करता येऊ शकेल. आज संपूर्ण जग वणव्याच्या समस्येने त्रस्त आहे. ज्या देशांमध्ये यावरील उपाययोजना यशस्वी झाल्या, त्यांच्या कार्यपद्धतींचा अभ्यास करून त्या महाराष्ट्रात लागू करण्याच्या सूचना दिल्याचे ( Forest Minister Ganesh Naik ) ते म्हणाले. प्रशासन सतर्क असल्याने मेळघाटात यंदा एकही वणवा नसल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
 
वन विभागाची वाहने थकली
 
वन विभाग तोट्यात नाही. ताडोबा व्याघ्र प्रकल्प नफ्यात असला तरी वन विभागाची वाहने थकली आहेत. त्यामुळे अत्याधुनिक वाहने खरेदी करण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. राज्यात वाघांची संख्या वाढली असून मानव-वन्यजीव संघर्षाबाबत जागरूक राहण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. काही दिवसांपूर्वी गुजरातच्या जामनगर येथील 'वनतारा' प्रकल्पाला भेट दिली. त्यानंतर अनंत अंबानींना पत्र लिहून वनतारा सारखा प्रकल्प महाराष्ट्रात उभारण्यासाठी निमंत्रित केल्याचे नाईक म्हणाले.
 
चंद्रपुरात फर्निचर कारखाना
 
वन विभागाच्या लाकडातून दर्जेदार फर्निचर तयार करणारा मोठा कारखाना सुरू करण्याचे सुधीर मुनगंटीवार यांचे स्वप्न आहे. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी चंद्रपूर औद्योगिक क्षेत्रात जागा निश्चित करण्यात आली असून महिन्याला दहा कोटी असे सात महिन्यांत 70 कोटींची गुंतवणूक करण्याचे नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिली.