नागपूर : राज्यात गावोगावी वसलेली पाठोडे, पाटवडे, पटोले आणि गायधने आडणावांची कुटुंब एका कुळातील असून, कोराडीची महालक्ष्मी जगदंबेचे माहेर ( Mahalaxmi Oti Celebration ) याच कुळातील असल्याची आख्यायिका आहे. या कुटुंबातील भाविक चैत्र पोर्णिमेला कोराडीच्या देवीचे दर्शन घेऊन सुख समृद्धीचे साकडे मागतात. दरवर्षी प्रमाणे यंदाही शनिवारी हा उत्सव कोराडीच्या महालक्ष्मी मंदिरात मोठया उत्साहात साजरा झाला.
चैत्र पोर्णिमा हा सण गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात वसलेल्या असंख्य गायधने पाठोडे कुटुबियांसाठी दिवाळी दसऱ्यासारखा असतो. त्याचे कारणही विशेष आहे. कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा ( Mahalaxmi Oti Celebration ) ही देवी याच कुळातील असल्याचे बोलल्या जाते. ही माहेरची माणसं, त्यामुळे त्यांचा यथायोग्य मानपानही मंदिर व्यवस्थापनाकडून करण्यात येते. पूर्वी गोंदिया, भंडारा येथील भाविक पाच दिवसांसाठी कोराडीत पोहचत. परंतु, काळ बदलला आणि पाच दिवसांची प्रथा एका दिवसावर आली. शनिवार हा उत्सव मोठ्या थाटात संपन्न झाला.
पोह्याची ओटी भरतात
यंदाच्या चैत्र पोर्णिमा उत्सवाला सुमारे 10 हजार भाविकांनी भेट दिल्याचे मंदिर व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. भाविकांनी देवीचे दर्शन घेऊन पोह्याची ओटी भरल्याचे मंदिराकडून ( Mahalaxmi Oti Celebration ) सांगण्यात आले. विशेष म्हणजे हा पाच दिवसांचा उत्सव जरी एकदिवसावर आला असला तरी, देवीलाजवळ माहेरच्या माणसांनी भरलेली ओटी पाच दिवस ठेवण्यात येते.
येताना तेल घेऊन येतात
या उत्सवाची दुसरी परंपरा म्हणजे टिपूर, देवीच्या माहेरची माणसे तिच्या भेटीला येताना तेल घेऊन येतात. संध्याकाळी मंदिरात कोराडीचे सावकार याच तेलाने टिपूर प्रज्वलित करतात. त्यानंतर गायधने, पोठोडे कुटुंबियांच्या उत्सवाची सांगता होते.
कोराडी देवीचा चैत्र पोर्णिमेचा उत्सव पूर्वापार होत आलेला आहे. पिढ्या बदलल्या, कुटुंब पूर्वीपेक्षा समृद्ध झाले, अनेकांचे व्यवसाय बदलले परंतु, प्रथा आणि देवीचे उपासना तशीच चालू आहे. भंडारा गोंदियातील अनेक कुटुंब आता नागपूर शहरात वास्तव्यास असून, त्यांचेही या उत्सवासाठी विशेष योगदान लाभते.
- गणेश पाठोडे
कोराडी मंदिरात भाविकांचा जनसागर
गुढीपाडव्यापासून प्रारंभ झालेल्या चैत्र नवरात्रोत्सवामुळे शहरात धार्मिक वातावरण निर्माण झाले असून, कोराडीच्या महालक्ष्मी जगदंबा ( Mahalaxmi Oti Celebration ) मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली. शनिवार व रविवार या सुटीच्या दोन दिवसात सुमारे 55 हजाराहून अधिक भाविक आई जगदंबेचे दर्शन घेण्याचा अंदाज मंदिर प्रशासनाकडून वर्तविण्यात आला आहे.
महालक्ष्मी जगदंबा ( Mahalaxmi Oti Celebration ) देवीच्या गाभाऱ्याला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून, संपूर्ण परिसर रंगीबेरंगी विद्युत रोषणाईने सजविण्यात आला आहे. मंदिरात यंदा प्रथमच नऊ दिवसीय सप्तसती हवनाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त वाढलेल्या तापमानाचा त्रास भाविकांना होऊ नये, या दृष्टीने भाविकांच्या दर्शन रांगेत पेंडॉल घालण्यात आला असून, भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व बसण्याची सोय करण्यात आली आहे.
जगदंबा देवीचे सुमारे 22 वर्षांपासून दर्शन घेत असलेल्या कोमल वर्मा यांनी इतक्या वर्षातील बदलत्या व्यवस्थेबाबत सांगितले. पूर्वी मंदिराचे वाहनतळ मागील बाजूस असल्याने मंदिराच्या मागील प्रवेशद्वाराने येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी होती. मंदिराला लागून असलेल्या जलाशयात नौका विहाराची व्यवस्था होती असेही त्या म्हणाल्या. आता संपूर्ण परिसर बदलला असून मंदिराचे व्यवस्थापन अत्यंत चांगले असल्याच्या भावना वर्मा यांनी व्यक्त केल्या.