Luxury Number Plate : केरळमधील CEO चा लक्झरी शौक ! नंबर प्लेटसाठी दिले तब्बल 46 लाख

12 Apr 2025 18:32:25

ceo
 
दिल्ली : ( Luxury Number Plate ) केरळमधील लिटमस 7 सिस्टम्स कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सीईओ आणि संस्थापक वेणू गोपालकृष्णन यांनी राज्यातील सर्वात महागडा वाहन नोंदणी क्रमांक खरेदी केला आहे. यानंतर गोपालकृष्णन हे चांगलेच चर्चेत आल्याचे पाहायला मिळत आहेत. मोटार वाहन विभागाने (एमव्हीडी) आयोजित केलेल्या ऑनलाइन लिलावात ( Luxury Number Plate ) त्यांनी 45.99 लाख रुपये देऊन त्यांच्या अंदाजे 4 कोटी रुपये किमतीच्या लक्झरी लॅम्बोर्गिनी उरुस परफॉर्मंट कारसाठी ‘KL 07 DG 0007’ हा नंबर विकत घेतला आहे. हा लिलाव 7 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये हा क्रमांक मिळवण्यासाठी जोरदार चढाओढ लागल्याचे पाहायला मिळाले. या क्रमांकासाठी 5 जणांनी 25 हजार रुपयांपासून बोलीला सुरूवात केली.
 
 
अखेर या लिलावात शेवटी दोन जण शिल्लक राहिले, मात्र हा क्रमांक मिळवण्यासाठी गोपालकृष्णन ( Luxury Number Plate ) यांनी अखेरची बोली लावली आणि त्यांनी हा क्रमांक मिळवला. त्यांनी थोड्याशा फरकाने 44.84 लाख रुपयांच्या दुसऱ्या क्रमांकाच्या बोलीला मागे टाकले. दुसरा एक फॅन्सी क्रमांक ‘KL 07 DG 0001’ यासाठी देखील या लिलावात बोली लावण्यात आली आणि हा क्रमाक 25.52 लाख रुपयांना विकला गेला. केरळच्या सरकारने फॅन्सी वाहन क्रमांकाचे सहा वेगवेगळ्या श्रेणींमध्ये वर्गीकरण केले होते. ज्यामध्ये सुरूवातीची किंमत 3000 रुपयांपासून ते 1 लाख रूपयांपर्यंत ठेवण्यात आल्या होत्या. ‘1’ या क्रमांकाला सर्वाधिक मागणी असल्याने याची मूळ किंमत ही सर्वाधिक म्हणजेच 1 लाख रुपये होती.
 
 
Powered By Sangraha 9.0