नागपूर : ( Leopard Rescue Samruddhi Expressway ) नागपूरमध्ये सकाळी धक्कादायक घटना घडली, ज्यात बिबट्याला फिजिकली पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. हा प्रसंग रविवारी सकाळी मुंबईकडून नागपूरकडे येणाऱ्या समृद्धी महामार्गावर घडला. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या प्रवेशद्वाराजवळ बिबट्या दिसल्याने अचानक गोंधळ उडाला. बिबट्या पळत असताना, त्याचा पाय शेजारच्या शेतातील तारेच्या कुंपणात अडकला. क्षणार्धात लोकांची गर्दी जमली. पुढे बुटीबोरीच्या वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यांनी बिबट्याच्या सुटकेसाठी ( Leopard Rescue Samruddhi Expressway ) तात्काळ ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर (टीटीसी) ला कॉल करून बोलावून घेतले. घटनास्थळी वन्यजीव रेस्क्यू टीम दाखल झाली आणि त्यांनी तात्काळ बिबट्याला सुरक्षितपणे पकडण्याचा निर्णय घेतला.
बिबट्याच्या पाय अडकलेल्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर, रेस्क्यू ऑपरेशन ( Leopard Rescue Samruddhi Expressway ) सुरू करण्यात आले. टीमने विशेष पद्धतीने बिबट्याचा समोरील पाय आणि मान पकडून, त्याला सुरक्षितपणे रुग्णवाहिकेत शिफ्ट केले. बिबट्याला काही किरकोळ जखमा झाल्या होत्या, ज्यावर उपचार सुरू करण्यात आले. त्याला ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये आणण्यात आले, जिथे त्याच्या उपचाराची काळजी घेतली जाईल.
अत्यंत वेगवान रेस्क्यू ऑपरेशन
हे रेस्क्यू ऑपरेशन अत्यंत वेगाने पार पडले होते, आणि ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा रेस्क्यू त्यांचा सर्वात वेगवान फिजिकल रेस्क्यू ऑपरेशन होता. या ऑपरेशनमध्ये उपवनसंरक्षक डॉ. भरतसिंह हाडा, सहाय्यक वनसंरक्षक मनोज धनविजय, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमोद वाडे आणि माजी सदस्य राज्य वन्यजीव मंडळ कुंदन हाते यांचे मार्गदर्शन होते. त्यांच्यासोबत वनरक्षक हरीश किनकर, प्रतीक घाटे, सानप, आंधळे, समीर नेवारे, डॉ. राजेश फुलसुंगे, डॉ. सिद्धांत मोरे, बंडू मंगर, खेमराज नेवारे, विलास मंगर, आशिष महाले यांचा देखील यामध्ये महत्त्वाचा सहभाग होता.