Chief Minister Residence Theft : "मुख्यमंत्र्यांच्या उंबऱ्यावरच दरोडा ? धाडसी चोरांचा डॉलरसह 1.75 लाखांवर डल्ला !"

14 Apr 2025 15:29:58

cm f
 
नागपूर : ( Chief Minister Residence Theft ) धरमपेठच्या त्रिकोणी पार्क परिसरातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराजवळच चोरांनी धाडसी घरफोडी केली. रोकड, मोत्यांचा हार आणि यूएस डॉलरसह एकूण 1 लाख 75 हजार रुपयांच्या मालावर डल्ला मारला. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांची घरी 24 तास पोलिसांचा पाहारा ( Chief Minister Residence Theft ) असतो आणि परिसरात गस्त ही सुरू असते. त्यानंतरही परिसरात चोरी होणे आश्चर्यकारक आहे. चोरांमध्ये पोलिसांची अजिबात भीती नसल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे. पोलिसांनी राजेंद्र श्रीधर घारपुरे (64) रा. त्रिकोणी पार्कच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे.
 
 
राजेंद्र बँकेतून निवृत्त झाले आहेत. ते पत्नीसह त्रिकोणी पार्क परिसरात राहतात. त्यांची मुलगी ऐश्वर्या बंगळुरूमध्ये नोकरी करते आणि तेथेच राहते. गत 28 मार्चच्या सकाळी राजेंद्र घराला कुलूप लावून पत्नीसोबत मुलीकडे बंगळुरूला गेले होते. या दरम्यान चोरांनी मुख्य दाराचे कुलूप तोडून त्यांच्या घरात प्रवेश ( Chief Minister Residence Theft ) केला. 300 अमेरिकन डॉलर, मोत्यांची माळ आणि रोख 1.25 लाख असा एकूण 1.75 लाख रुपयांचा माल चोरी करून फरार झाले.
 
शुक्रवारी घराशेजारी राहणारे अजय गुप्ता यांनी राजेंद्रला फोन करून माहिती दिली की, त्यांच्या घराच्या कम्पाऊंडचे दार उघडे आहे. राजेंद्र यांनी त्यांना जाऊन पाहण्यास सांगितले असता प्रवेशद्वार आणि मुख्य दाराचे कुलूप तुटलेले होते. यावरून घरी चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. राजेंद्र यांनी आपल्या नातेवाईकाला घरी जाऊन पाहण्यास सांगितले. नातेवाईकाने घरात जाऊन पाहणी केली असता सर्व सामान अस्तव्यस्त पडून होते. लोखंडी कपाटाचे कुलूपही तुटलेले होते. राजेंद्र तात्काळ नागपूरसाठी रवाना झाले. सीताबर्डी पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची फुटेज तपासण्यात येत आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0