Gold Price Vs PM Salaries : नेहरूंना सोनं स्वस्त, मोदींना महाग ? पगारातून किती सोनं खरेदी करता आलं ? महागाईच्या 75 वर्षांच्या प्रवासाची कहाणी

14 Apr 2025 07:30:40
 
gold  
दिल्ली : ( Gold Price Vs PM Salaries ) सत्ताधारी नेत्यांनी पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंपासून ते इंदिरा गांधींपर्यंत सर्वांनाच महागाई वाढण्यासाठी जबाबदार धरले आहे. तर विरोधी पक्ष नरेंद्र मोदी यांच्यावर महागाई वाढवण्याचे खापर फोडत असतात. मात्र, स्वातंत्र्यानंतर पंतप्रधानांच्या पगारात सुमारे 55 पट वाढ झाली तर सोन्याच्या किमतीत 1015 पट वाढ झाली आहे.
 
स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ( Gold Price Vs PM Salaries ) यांचा पगार दरमहा 3 हजार रुपये होता आणि सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 88.62 रुपये होता. म्हणजे ते त्यांच्या पगारातून 340 ग्रॅम सोने खरेदी करू शकले असते. तर, सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Gold Price Vs PM Salaries ) यांचे वेतन दरमहा 1 लाख 66 हजार रुपये आहे. मोदींचा पगार नेहरूंपेक्षा 5,533 टक्के जास्त आहे, असे असूनही मोदी त्यांच्या संपूर्ण पगारातून फक्त 18.4 ग्रॅम (अंदाजे) सोने खरेदी करू शकतात. सध्या सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 90 हजार रुपयांच्या वर गेला आहे.
 
 हेही वाचा - Leopard Rescue Samruddhi Expressway : समृद्धीवर बिबट्याचा थरार ! आजवरचे सर्वात वेगवान रेस्क्यू ऑपरेशन
 
नेहरू ( Gold Price Vs PM Salaries ) कमीत कमी साधनसंपत्तीने जीवन जगण्यावर भर देत असत. त्यांचे वैयक्तिक सचिव एम ओ मथाई 'रेमिनिसेन्सेस ऑफ नेहरू एज' या पुस्तकात लिहितात की त्यांच्यासाठी 500 रुपयांचा करमुक्त मनोरंजन भत्ता देण्याची शिफारस करण्यात आली होती. नेहरूंनी हा प्रस्ताव नाकारला. या रकमेतून सुमारे 56 ग्रॅम सोने खरेदी करता आले असते.
 
स्वातंत्र्यानंतर सोन्याचा प्रवास [ दर प्रति तोळा (रुपयात)]
पंतप्रधान वर्ष सोन्याचे दर
 
जवाहरलाल नेहरू 1947 88.62
गुलजारीलाल नंदा 1964 63
लाल बहादूर शास्त्री 1966 84
गुलजारीलाल नंदा 1966 84
इंदिरा गांधी 1977 486
मोरारजी देसाई 1979 937
चरण सिंह 1980 1,330
इंदिरा गांधी 1984 1,970
राजीव गांधी 1989 3,140
व्ही. पी. सिंह 1990 3,200
चंद्रशेखर 1991 3,466
 
हेही वाचा - Maharashtra Violence Surge : देशात 84% दंगलींमध्ये वाढ, महाराष्ट्र का बनतोय हिंसाचाराचा केंद्रबिंदू ?  
 
पी. व्ही. नरसिंह राव 1996 5,160
अटल बिहारी वाजपेयी 1996 5,160
एच. डी. देव गौडा 1997 4,725
इंदर कुमार गुजराल 1998 4,045
अटल बिहारी वाजपेयी 2004 5,850
मनमोहनसिंग 2014 28,006
नरेंद्र मोदी 2019 35,220
नरेंद्र मोदी 2024 75,600
नरेंद्र मोदी 2025 95,000
 
नेहरूंच्या 17 वर्षांच्या राजवटीचा दर काय ?
 
देशातील पहिली सार्वत्रिक निवडणूक 1952 मध्ये पार पडली. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला बहुमत मिळाल्यानंतर जवाहरलाल नेहरू पंतप्रधान ( Gold Price Vs PM Salaries ) म्हणून निवडले गेले. त्यावेळी सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 76 रुपये होता. 1957 मध्ये दुसरी सार्वत्रिक निवडणूक झाली. नेहरूंना पुन्हा पंतप्रधान बनवण्यात आले. यावेळी सोन्याचा दर प्रतितोळा 90 रुपये होता. तिसरी सार्वत्रिक निवडणूक 1962 मध्ये झाली.
 
1962 मध्ये सोन्याच्या किमतीत चढ-उतार
 
1962 मध्ये 10 ग्रॅम सोन्याची किंमत 82 ते 121.65 रुपये होती. त्या काळात सोन्याच्या किमतीत खूप चढ-उतार पहायला मिळाले. भारताच्या चीनशी झालेल्या युद्धामुळे या पिवळ्या धातूच्या किमतीतील ही अस्थिरता होती. नेहरूंच्या 17 वर्षांच्या कार्यकाळात त्यांचा पगार दोनदा कमी करण्यात आला. प्रथम तो 3000 रुपयांवरून 2,250 रुपये करण्यात आला आणि दुसऱ्यांदा 2000 रुपये करण्यात आला.
Powered By Sangraha 9.0