Gold Seizure At Airport : 6.3 कोटींचं सोने लपवलं बुटात ! बँकॉकहून आलेल्या दोन प्रवाशांना अटक

Top Trending News    14-Apr-2025
Total Views |

gold
 
मुंबई : ( Gold Seizure At Airport ) आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) 6.3 कोटी रुपयांच्या सोन्याची तस्करी ( Gold Seizure At Airport ) उघडकीस आणली आहे. बँकॉकहून आलेल्या एका प्रवाशाला बुटात लपवून सोनं आणताना अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून तब्बल 6.7 किलो सोने जप्त करण्यात आलं आहे.
 
संबंधित प्रवासी मुंबई आणि बँकॉकदरम्यान वारंवार प्रवास करत असल्याची माहिती समोर आली असून, त्याच्यावर पूर्वीही तस्करीची संशयित नजर होती. यावेळी गुप्त माहितीनुसार, DRI अधिकाऱ्यांनी विमानतळावर कारवाई करत त्याची कसून झडती घेतली असता, बुटात अत्यंत कुशलतेने लपवलेले हे सोने सापडले ( Gold Seizure At Airport ).
 
 
तपासादरम्यान, प्रवाशाने जेव्हा चौकशीला सुरुवात झाली, तेव्हा त्याने एका खरेदीदाराचे नाव उघड केले, जो या सोन्याचा प्रत्यक्ष ग्राहक होता. यावरूनच पुढे सखोल चौकशी करून संबंधित खरेदीदारालाही अटक करण्यात आली. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या खरेदीदाराचे एका आंतरराष्ट्रीय सोनं तस्करी करणाऱ्या टोळीशी संबंध असल्याचा संशय आहे.
 
सध्या या प्रकरणाचा तपास सुरु असून, आणखी कोणी या रॅकेटमध्ये सामील आहे का, याचा शोध घेतला जात आहे. सीमा शुल्क आणि महसूल गुप्तचर संचालनालय यांनी संयुक्तरीत्या पुढील कारवाईसाठी दोघांना न्यायालयात हजर केलं आहे.