Mayo College Food Contamination : "मेयोत विद्यार्थिनींच्या ताटात अळ्या! तक्रारीला केराची टोपली, आरोग्य धोक्यात"

Top Trending News    14-Apr-2025
Total Views |
 
meyo
 
नागपूर : ( Mayo College Food Contamination )  इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) मुलींच्या वसतिगृहात जेवणात अळ्या आढळल्याने खळबळ उडाली होती. याची तक्रार वॉर्डनकडे करण्यात आली आहे. मात्र अद्यापही यासंदर्भात ठोस पावले उचलण्यात आली नसल्याने भावी महिला डॉक्टरांमध्ये असंतोष भडकला आहे. तर पाण्याचा देखील दुर्भिक्ष मेयोत आहे.
 
 
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मुलींचे एकच वसतिगृह आहे. येथील खाणावळीत मुली जेवतात. दोन दिवसांपूर्वी ताटात अळ्या आढळल्या. यामुळे सर्व मुलींनी महिला वॉर्डनकडे तक्रार ( Mayo College Food Contamination ) केली. त्यांनी तातडीने चौकशी करण्याची गरज होती. परंतु, कोणतेही ठोस पावले उचलली गेली नाहीत, असे मुलींचे म्हणणे आहे. रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला देताना डॉक्टरांनी अळ्या युक्त निकृष्ट दर्जाचे जेवण करून आजारी पडायचे असा सवाल मुलींनी केला आहे. मात्र त्यांनी अधिष्ठातांशी चर्चा केली असल्याचे सांगून वेळ मारून नेली. त्यामुळे मुलींमध्ये रोष पसरला आहे.
 
पाण्याची समस्या पेटली .... म्हणे पैसे जमा करून टँकर बोलवा
 
मेयोतील वसतिगृहात ( Mayo College Food Contamination ) पाण्याची समस्या पेटली आहे. उन्हाळ्यात पाणी पुरवठा कमी होतो असे सांगून समस्येवर बोलणे टाळले जाते. उकाडा असल्याने कुलरसाठीही मोठ्या प्रमाणात पाणी लागते. याचीही महिला वॉर्डनकडे तक्रार केली होती. पण त्यांनी पाण्याची सोय तुम्ही स्वतः करा.. वर्गणी करून पैसे गोळा करा आणि टँकर बोलवा असा सल्ला दिल्याचे मुलींनी प्रतिक्रिया देताना सांगितले. नागपुरात राहणाऱ्या मुली तसेच मुले घरी अंघोळीसाठी जातात. काही मुले पाण्याची कॅन बोलावतात. अशाप्रकारे मेयोत पाणी समस्या पेटली आहे.