Fake Teacher Scam : "शिक्षक नव्हता, तरी मिळाली शालार्थ आयडी ! शिक्षण उपसंचालक अडचणीत"

15 Apr 2025 18:43:20

fake
 
नागपूर : ( Fake Teacher Scam ) शिक्षक नसतानाही शालार्थ आयडी देण्याचा प्रताप शिक्षण उपसंचालक यांनी केला असून या प्रकरणी त्यांच्या विरोधात सदर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित बोगस शिक्षक ( Fake Teacher Scam ) एका खासगी शाळेत असल्याचे बनावट कागदपत्र तयार केले. या कागदपत्राच्या आधारे त्याला उपसंचालक कार्यालयाकडून शालार्थ आयडी देण्यात आले. त्यानंतर त्याला भंडारा जिल्ह्यातील एका शाळेत बदली देण्यात आली. या शालार्थ आयडीच्या आधारे संबंधित शिक्षकांने शासकीय वेतनाचीही उचल केली. हे करता येत नसल्याचे काहींनी त्याच्या निदर्शनास आणून दिले. परंतु, त्यानंतरही त्यांनी संबंधित शिक्षकास शालार्थ आयडी दिल्याची चर्चा आहे. नियमांचे उल्लंघन करून त्यांनी शालार्थ आयडी दिल्याचा आरोप ( Fake Teacher Scam ) करण्यात येत आहे.
 

शालार्थ आयडी साठी गठीत टीमचा नकार
 
संबंधित शिक्षकाच्या विरोधात सदर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. ते भंडारा जिल्ह्यातील एका खासगी शाळेत मुख्याध्यापक आहेत. त्यांनी नागपूरमधील एका खासगी शाळेची बनावट कागदपत्रे तयार केली आणि त्याद्वारे शालार्थ आयडी मिळवून शासनाचे वेतन प्राप्त केले. शालार्थ आयडी ही शिक्षकांना ( Fake Teacher Scam ) वेतन मिळवण्यासाठी आवश्यक असते आणि ती देण्याचा अधिकार शिक्षण उपसंचालकांना असतो. या प्रकरणात शिक्षण उपसंचालक यांवरही गंभीर आरोप आहेत. त्यांनी संबंधित शिक्षकास नियमांचे उल्लंघन करून ही आयडी मिळवून दिली. शिक्षकाने संबंधित खासगी शाळेत प्रत्यक्ष नोकरी केली नव्हती. तरीही त्यांना शालार्थ प्रणालीत समाविष्ट करण्याची परवानगी जुलै 2023 रोजी देण्यात आली. शालार्थ आयडी प्रदान करण्याकरिता एक टीम नेमण्यात आली आहे. त्या टीमनेही संबंधित शिक्षकाबाबत माहिती दिली होती. तरही शालार्थ आयडी देण्यात आली.
 
शिक्षक भरतीसाठी चौकशी समिती गठीत
 
नागपूरसह राज्यातील काही ठिकाणी शिक्षक भरतीत अनियमितता झाल्याच्या तक्रारी आहेत. या प्रकरणी शासन स्तरावरून एक पाच सदस्यीय चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार समिती याच आठवड्यात नागपुरात येणार आहे. त्यांच्याकडून आवश्यक कागदपत्रे सादर करण्याच्या निर्देश दिल्याची माहिती आहे.
 
- या प्रकरणी आयुक्त शिक्षण स्तरावरून चौकशी सुरू आहे. माहिती गोळा करणे, तपासून बघणे सुरू आहे. चौकशी करून योग्य कारवाई केली जाईल.
उल्हास नरड, शिक्षण उपसंचालक, नागपूर.
 
 
Powered By Sangraha 9.0