दिल्ली : ( Gold Price Surge ) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लावल्यानंतर जगभरातील शेअर बाजार कोसळले. सोन्याच्या मागणीने जोर धरला आहे. त्यामुळे सतत नवीन उंची गाठत असलेले सोने यावर्षी अक्षय्य तृतीयेपर्यंत प्रति 10 ग्रॅम 1 लाख रुपये ( Gold Price Surge ) दर ओलांडू शकते. सध्या सोन्याचा दर 96,000 रुपयांच्या वर आहे. गेल्या वर्षी अक्षय्य तृतीयेपासून आतापर्यंत सोन्याच्या किमतीत 32 टक्क्यांनी वाढ ( Gold Price Surge ) झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.
अनेक देशांमधील तणाव आणि अमेरिकन टॅरिफमुळे सुरक्षित मानल्या जाणाऱ्या या मौल्यवान धातूच्या किमतीत यावर्षी प्रचंड वाढ झाली आहे. या वर्षी आतापर्यंत सोने 22 टक्क्यांनी म्हणजेच 17,000 रुपयांनी महाग झाले आहे, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. 10 मे 2024 रोजी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 73,000 रुपये होता. आता तो 96,000 रुपयांच्या पुढे गेला आहे. अलिकडच्या काळात डॉलरच्या तुलनेत रुपयामध्येही लक्षणीय सुधारणा झाली आहे. डॉलरवरील दबावामुळे पिवळ्या धातूच्या किमतीही वाढण्याची अपेक्षा आहे.
सोने खरेदी शुभ
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे, या महिन्यात किरकोळ व्यापाऱ्यांपासून ते किरकोळ ग्राहकांपर्यंत मोठ्या प्रमाणात खरेदी दिसून येते. अशा परिस्थितीत मागणी वाढल्याने किमती वाढू शकतात. या वर्षी अक्षय्य तृतीया 30 एप्रिल रोजी आहे. त्यानंतर, विवाहासाठी शुभ काळदेखील सुरू होईल. अशा परिस्थितीत येथून सोने खरेदी करण्याचा ट्रेंड सतत राहील.