MLA Misconduct : आमदाराचा सत्तेचा माज ! साड्या वाटप करताना महिलांशी गैरवर्तन

Top Trending News    15-Apr-2025
Total Views |

mla
बक्सर : ( MLA Misconduct ) बिहारच्या ब्रह्मपूरचे आमदार शंभू यादव यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते साड्या वाटप करताना महिलांशी गैरवर्तन करताना दिसत आहे. रागाच्या भरात त्यांनी एका महिलेच्या डोक्यावर साडीने मारले. आता हा व्हिडीओ वेगाने व्हायरल ( MLA Misconduct ) होत आहे. साडी वाटप कार्यक्रमादरम्यान ही संतापजनक घटना घडली.

या कार्यक्रमात तेजस्वी यादव यांनीही सहभाग घेतला होता. आमदार शंभू यादव महिलांना साड्या वाटप करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. साड्या वाटताना त्यांचे वर्तन योग्य नव्हते, असा आरोप लोकांनी केला आहे. रागाच्या भरात त्यांनी एका महिलेच्या डोक्यावर साडीने मारले. साडी वितरण कार्यक्रमात सुमारे 10 हजार महिलांना साड्या वाटप करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
आमदारांनी फेटाळले आरोप
आमदार शंभू यादव यांनी हा आरोप खोटा असल्याचे सांगितले आहे. गरीब महिलांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता अशी माहिती दिली. आरोप-प्रत्यारोपांच्या दरम्यान, आमदाराचा जो व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्यात ते महिलांना साड्या वाटण्याऐवजी त्यांच्यावर फेकताना दिसत आहे. महिलांसोबत साडी वाटप करताना गैरवर्तन केल्याने लोक संतापले आहेत.