Mehul Choksi Arrested : "७ वर्षांनी अखेर चोक्सीला बेड्या ! १४ हजार कोटींच्या घोटाळ्याचा शेवट जवळ ?"

14 हजार कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी : बेल्जियममध्ये अटक, भारतात प्रत्यार्पणाची तयारी, 7 वर्षांनी चोक्सीला बेड्या

Top Trending News    15-Apr-2025
Total Views |

mehul
 
दिल्ली : ( Mehul Choksi Arrested ) पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) हजारो कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली आहे. बेल्जियम पोलिसांनी गीतांजली ग्रुपचा मालक हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला बेड्या ठोकल्या ( Mehul Choksi Arrested ). तो सात वर्षांहून अधिक काळापासून भारतीय तपास संस्थांच्या रडारवर होता. चोक्सी स्वित्झर्लंडला पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलिसांना आढळले. केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या (सीबीआय) विनंतीवरून चोक्सीला शनिवारी अटक करण्यात आली असून सध्या चोक्सीला तुरुंगात ( Mehul Choksi Arrested ) ठेवण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारतीय एजन्सी सीबीआय आणि ईडीने चोक्सीचा बेल्जियमच्या न्यायालयात जामीन रोखण्यासाठी आणि त्याच्या प्रत्यार्पणासाठी तयारी सुरू केली आहे.
 
 
पंजाब नॅशनल बँकेतील 14,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप मेहुल, त्याचा पुतण्या नीरव मोदी, त्याची पत्नी अमी मोदी आणि भाऊ नीशल मोदीवर आहे. बेल्जियममध्ये आढळल्यानंतर भारतीय तपास संस्थांनी चोक्सीला अटक करण्याची मागणी करणारे पत्र तेथील अधिकाऱ्यांना पाठवले होते. यानंतर, बेल्जियम पोलिसांनी मुंबई न्यायालयाने जारी केलेल्या वॉरंटच्या आधारे चोक्सीला ( Mehul Choksi Arrested ) अटक केली.
 
ब्लड कॅन्सरचे कारण पुढे
 
फेब्रुवारीच्या सुरुवातीला मेहुल चोक्सीच्या वकिलाने मुंबईतील एका न्यायालयात सांगितले होते की मेहुल चोक्सी ब्लड कॅन्सरच्या उपचारासाठी बेल्जियममध्ये असल्याने तो भारतात परतू शकत नाही. त्याला अटक करण्यासाठी भारतीय यंत्रणांना फक्त एक नव्हे तर तीन देशांमध्ये अनेक वेळा अडचणींचा सामना करावा लागला.
 
जामीनासाठी अर्ज
 
बेल्जियममध्ये अटक झाल्यानंतर मेहुल चोक्सीने प्रकृती बिघडल्याचे ( Mehul Choksi Arrested ) कारण देत जामीन मागितला असून चोक्सीचे वकील म्हणतात की, त्यांचा क्लाइंट आजारी आहे. त्यामुळे, त्याला जामीन दिला जावा. वकिलाने सांगितले की, चोक्सी अँटिग्वा आणि बारबुडाहून बेल्जियममध्ये उपचारासाठी आला होता आणि त्याची पत्नी प्रीती चोक्सीसोबत अँटवर्पमध्ये राहत होती, जिथे त्याला अटक करण्यात आली.
 
2018 मध्ये गाठले अँटिग्वा
 
चोक्सी 2018 मध्ये भारतातून पळून अँटिग्वाला पोहोचला. मेहुलने एका गुंतवणूक कार्यक्रमाद्वारे तिथले नागरिकत्व मिळाले. मेहुलची पत्नी प्रीती बेल्जियमची नागरिक आहे. बेल्जियममध्ये रेसिडेन्सी कार्ड मिळविण्यासाठी त्याने बनावट कागदपत्रे सादर केली. सुमारे चार वर्षांपूर्वी 2021 मध्ये चोक्सीला डोमिनिकन रिपब्लिकमध्ये अवैध प्रवेशाच्या प्रकरणात ताब्यात घेण्यात आले होते. त्याला अटक करण्यासाठी सीबीआयचे पथक कॅरिबियन देशात पाठवण्यात आले. चोक्सीच्या वकिलांनी डोमिनिकन कोर्टाला सांगितले की त्याला उपचारांसाठी अँटिग्वाला परतावे लागेल व तो खटल्यासाठी नंतर परत येईल. 51 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर चोक्सीला ब्रिटिश राणीच्या प्रिव्ही कौन्सिलकडून दिलासा मिळाला आणि प्रत्यार्पणाची प्रक्रिया पुढे जाऊ शकली नाही. तो अँटिग्वाला परत गेला. डोमिनिकन रिपब्लिकमध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याबद्दल त्याच्यावरील आरोप नंतर मागे घेण्यात आले.