Congress In RSS Bastion : संघाच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची डरकाळी ! जोरदार शक्तिप्रदर्शन

16 Apr 2025 10:55:24

congress rs
नागपूर : ( Congress In RSS Bastion ) विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर काँग्रेस बुधवार, 16 एप्रिलला नागपुरात प्रथमच शक्तीप्रदर्शन करणार आहे. मध्य नागपुरातील संघाच्या बालेकिल्यातील ( Congress In RSS Bastion ) काही भागात झालेल्या दंगलग्रस्त भागात सद्भावना यात्रा काढून शांततेचा संदेश देणार आहे. एकप्रकारे हे शक्तिप्रदर्शनच असून, यात नियुक्तीनंतर प्रथमच प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला, सहप्रभारी कुणाल चौधरी आदी सहभागी होत आहे.
 
 
'ऐक्याची वाटचाल - नागपूर एकत्र'या टॅगलाईनने शांततेचा संदेश देण्याची काँग्रेसची ( Congress In RSS Bastion ) तयारी आहे. ही शांतीयात्रा दंगलग्रस्त भागात फिरून बेबनाव झालेल्या दोन समाजातील नागरिकांमध्ये शांतता, ऐक्य आणि सद्भावनेचा दीप प्रज्वलीत करण्यासाठी असल्याचे जाहीर करण्यात आले. विरोधी पक्षाने दुही माजलेल्या भागात शांततेसाठी प्रयत्न करणे कर्तव्य आहे. परंतु, या शांतीयात्रेला फार उशीर झाल्याची टीकाही होत आहे. परंतु, यानिमित्ताने काँग्रेस किती संघटित आहे, हे सर्वांसमोर येईल. सकाळी 9.30 वाजता महालातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला माल्यार्पण करून गांधी गेट येथून शांती यात्रेला सुरुवात होईल.
 
नरसिंग टॉकीज, कोतवाली चौक, बडकस चौक, चिटणीस पार्क, देवडिया भवन, भालदारपुरा चौक, गंजीपेठ ते रजवाडा पॅलेस असा मार्ग असेल. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष सपकाळ हे शांतीयात्रेच्या प्रारंभी दीक्षाभूमी, टेकडी गणेश मंदिर तसेच ताजाबाद येथे दर्शन घेतील. त्यानंतर शांतीयात्रेत सहभागी होणार आहे. 'ही यात्रा हा फक्त एक कार्यक्रम नाही, तर आपल्या मुल्यांची पुन:स्थापना आहे. शांतता, ऐक्य आणि सद्भावनेच दीप प्रज्वलित करण्यासाठी आपण सर्वांनी या ऐतिहासिक यात्रेत एकजुटीने सहभागी व्हावे' असे आवाहन शहराध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0