नागपूर : ( Teacher Bribe Scandal ) नागपूर येथील यादवनगर परिसरातील एस. के. बी. उच्च प्राथमिक माध्यमिक विद्या मंदिर शाळाचा शिक्षक असल्याचे खोटे कागदपत्र तयार केले. या खोट्या कागदपत्राद्वारे पराग पुडके याने भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथील शाळेत मुख्याध्यापकपद मिळविले. या प्रकरणी शिक्षण उपसंचालक उल्हास नरड, माध्यमिक शिक्षण विभागाचे अधीक्षक नीलेश मेश्रामसह पाच जणांना अटक करण्यात आली. या पाचही आरोपींना न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. विभागीय उपसंचालक कार्यालयातील शिक्षण उपनिरीक्षक संजय दुधाळकर व लिपीक सूरज नाईक यालाही अटक करण्यात आली आहे.
पराग याने खोट्या कागदपत्राच्या ( Teacher Bribe Scandal ) आधारे आधी एस. के. बी. उच्च प्राथमिक माध्यमिक विद्या मंदिर शाळेचा शिक्षक असल्याचे कागदपत्र तयार केले. त्यानंतर भंडाऱ्यातील लाखनीच्या देवताडा येथील नानाजी फडके विद्यालयात मुख्याध्यापक पदावर पदोन्नती घेतली. त्याचा प्रस्ताव मान्य करून शालार्थ आयडी तयार करीत वेतन काढण्याचे काम विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांनी केले. याबाबत तक्रार झाल्यावर सदर पोलिसांनी उल्हास नरड आणि मुख्याध्यापक पराग पुडके याला शुक्रवारी सायंकाळी गडचिरोली जिल्ह्यातून अटक केली.
25 लाखांचा सौदा पराग पुडके याने चौकशीत ( Teacher Bribe Scandal ) सांगितले की निलेश मेश्राम याने मला बनावट कागदपत्र तयार करून दिली. तसेच, शिक्षक म्हणून शाळेत नेमणूक दाखविली. त्यासाठी त्याने पराग यांच्याकडून १० लाख रुपये घेतले. अशी कबुली पराग पुडके याने पोलिसांना दिली आहे. दरम्यान त्याच्या पदोन्नतीचा प्रस्ताव उपसंचालक कार्यालयात गेल्यावर तो परस्पर हाताळून उल्हास नरड यांनी संजय आणि सूरजच्या माध्यमातून त्याचा शालार्थ आयडी ( Teacher Bribe Scandal ) तयार करण्यासाठी केल्याचे पोलिसांना तपासात समोर आले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नीलेश मेश्राम यांला 25 लाख रुपये देण्याचे निश्चित झाले होते. पहिल्या टप्प्यात 10 लाख रुपये व एक तांदळाचा पोता दिल्याची माहिती चौकशीत समोर आली.
समितीच अडकणार शालार्थ च्या जाळ्यात
शालार्थ आयडी देण्यासाठी चार जणांची समिती आहे. या समितीच्या शिफारशीच्या आधारेच शालार्थ आयडी तयार करण्यात येते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार समितीशी संबंधित कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले. या प्रकरणात त्यांच्यावर संशयाची सुई असून ते ही अडचणीत येणार असल्याची चर्चा आहे. त्याचप्रमाणे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनाही चौकशीसाठी बोलाविण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.