मुंबई : ( ATM In Panchavati Express ) देशाची जीवनरेखा असलेल्या भारतीय रेल्वेने आणखी एक इतिहास रचला आहे. आता ट्रेनने प्रवास करणाऱ्या नागरिकांना रोख रक्कम नसल्याची चिंता करावी लागणार नाही. तर, आता भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी गाड्यांमध्ये एटीएम सेवा सुरू केली आहे. मुंबई मनमाड पंचवटी एक्स्प्रेसमध्ये ( ATM In Panchavati Express ) अशा प्रकारे एटीएम मशीन असलेली देशातील पहिली ट्रेन ठरली आहे. या ट्रेनमध्ये बँक ऑफ महाराष्ट्राची एटीएम मशीन बसवण्यात आली आहे. या उपक्रमामुळे प्रवाशांना ही सुविधा अधिक उपयोगी ठरणार आहे.
या एटीएम मशीन मुळे आता रोख रकमेची समस्या सुटणार आहे. परंतु, पंचवटी एक्स्प्रेसमध्ये ( ATM In Panchavati Express ) बसवण्यात आलेल्या या एटीएमचे चोरांपासून संरक्षण करणे अतिआवश्यक आहे. त्यासाठी मजबूत शटर दरवाजा जोडलेला आहे. ते चालत्या ट्रेनमध्ये चांगले काम करू शकेल या पद्धतीने हे एटीएम बसवण्यात आले आहे. या एटीएममुळे लोकांना आता रोख रकमेची चिंता करावी लागणार नाही. ते ट्रेनमधून पैसे काढू शकतील. हे एटीएम विशेषतः मनमाड रेल्वे वर्कशॉपमध्ये डिझाइन केले आहे. इलेक्ट्रिकल सपोर्ट पासून ते इतर सर्व स्ट्रक्चरल गोष्टींपर्यंत, हाय स्पीड ट्रेनमध्येही एटीएम योग्यरीत्या काम करू शकेल याची विशेष काळजी घेण्यात आली आहे.
हा नाविन्यपूर्ण उपक्रम
आज सकाळी ही ट्रेन एटीएम कोचसह मुंबईत पोहोचली. हा एक अनोखा उपक्रम आहे आणि आम्हाला आशा आहे की ही सुविधा प्रवाशांसाठी खूप उपयुक्त ठरेल. पंचवटी एक्सप्रेस ( ATM In Panchavati Express ) ही मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मनमाड जंक्शन पर्यंत धावणारी सुपरफास्ट ट्रेन आहे. हे अंतर कापण्यासाठी या ट्रेनला सुमारे 4 तास 35 मिनिटे लागतात. ही ट्रेन मुंबईकरांसाठी जीवनरेखा आहे. त्यात हजारो प्रवासी प्रवास करतात. हे एटीएम त्या लोकांना खूप मदत करणार आहे.
- डॉ. स्वप्नील नीला , रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी