नागपूर: ( Congress Sadbhavana Yatra ) काँग्रेसच्या "सद्भावना शांती यात्रा"वर बुधवारी नागपूरमध्ये भाजपाने कडक टीका केली आहे. भाजपाचे आमदार प्रवीण दटके आणि संदीप जोशी यांनी काँग्रेसवर दंगलीच्या घटनेला महिना उलटूनही योग्य वेळी प्रतिक्रिया न देण्याचा आणि राजकीय फायद्यासाठी परिस्थितीचा वापर करण्याचा आरोप केला.
मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांनी सांगितले की, नागपुरात दंगेखोरांच्या कृतीमुळे दुर्दैवी घटना घडली. दंगलीनंतर तातडीने शांतता प्रस्थापित करणे आवश्यक ( Congress Sadbhavana Yatra ) होते, पण त्या वेळेस काँग्रेसचा एकही नेता पुढे आलेला नाही. महिना उलटल्यानंतर काँग्रेसला जाग आली. त्यांनी म्हटले की, दंगलीत सामान्य नागरिकांचे, त्यांच्या वाहनांचे, दुकानांचे आणि घरांचे मोठे नुकसान झाले, परंतु काँग्रेसने त्याबद्दल काहीही बोलले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने दंगेखोरांवर कारवाई केली आणि आता त्यांच्याकडूनच योग्य उत्तर मिळेल, असा विश्वास दटके यांनी व्यक्त केला.
विधानपरिषदेचे आमदार संदीप जोशी यांनीही काँग्रेसच्या यात्रा ( Congress Sadbhavana Yatra ) वर टीका केली. त्यांनी सांगितले की, नागपूरची परंपरा शांती आणि सौहार्दाची आहे. रामनवमी शोभायात्रेने त्याचे उदाहरण साऱ्यांसमोर ठेवले. रामजन्मोत्सवाच्या दिवशी मुस्लिम बांधवांनी दिलेलं स्वागत आणि पुष्पवृष्टी हे समाजात ऐक्य आणि सौहार्दाचे उत्तम उदाहरण होते. अशा स्थितीत काँग्रेसने दोन समाजात भेदभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, अशी गंभीर टीका जोशी यांनी केली. त्यांनी सांगितले की, हे एक राजकीय लाभासाठी केलेला पोकळ आणि धूर्त प्रयत्न आहे, जो निषेधार्ह आहे.