Samruddhi Expressway : " समृद्धीला लवकरच फुलस्टॉप ! शेवटचा टप्पा महाराष्ट्र दिनी खुला होणार का ?"

17 Apr 2025 21:05:35

samru 
 
मुंबई : ( Samruddhi Expressway ) नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील इगतपुरी-अमाणे दरम्यानचा शेवटचा 76 किमीचा मार्ग कधी खुला याची नागरिकांकडून वाट पहिली जात आहे. नागपूर ते मुंबई हा थेट प्रवास आठ तासांत कधी शक्य होईल, याची अजूनही प्रतीक्षा आहे. शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन 1 मे, महाराष्ट्र दिनी होईल का असा प्रश्न आता पडतांना दिसत आहे. एमएसआरडीसीने 55 हजार कोटी रुपये खर्चाचा 701 किमी लांबीचा नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग प्रकल्प ( Samruddhi Expressway ) सुरू केला आहे. हा संपूर्ण महामार्ग यापूर्वीच वाहतूक सेवेत आणला जाण्याची अपेक्षा होती. परंतु विविध कारणांमुळे हा प्रकल्प रखडला आहे.
 
काम पूर्ण झाले
 
दरम्यान, नागपूर-इगतपुरी दरम्यानचा 625 किमी लांबीचा महामार्ग टप्प्याटप्प्याने सेवेत आणण्यात आला आहे. आता इगतपुरी - आमने, भिवंडीचा शेवटचा आणि महत्त्वाचा टप्पा प्रतीक्षेत आहे. जर हा टप्पा कार्यान्वित झाला तर मुंबईकरांना फक्त आठ तासांत नागपूरला पोहोचता येईल. शेवटच्या टप्प्याचे 100 % काम पूर्ण झाले आहे आणि आता एमएसआरडीसीने हा टप्पा वाहतूक सेवेत आणण्याचा निर्णय घेतला आहे. 1 मे रोजी इगतपुरी-आमणे टप्प्यावर वाहतूक सेवा सुरू करण्याच्या ( Samruddhi Expressway ) उद्देशाने प्रकल्पाच्या ठिकाणी साफसफाईचे काम सुरू करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
 
 
भव्य उदघाटन समारंभ
 
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे समृद्धी महामार्गावर 1700 कोटींच्या ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू केली आहे. इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ ही एक हायटेक प्रणाली आहे जी ट्रॅफिक उल्लंघन, वाहनांची हालचाल आणि आपत्कालीन परिस्थितींवर लक्ष ठेवते. 701 किमी लांबीच्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर ( Samruddhi Expressway ) ही प्रणाली कार्यान्वित होईल. या महामार्गावर एक भव्य उद्घाटन समारंभ होणार असून उपमुख्यमंत्री तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वेळेचेही व्यवस्थापन केले जात असल्याचे मानले जात आहे. एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांना याबद्दल विचारले असता, त्यांच्याकडून कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही.
 
176 मोठ्या अपघातांची नोंद
 
डिसेंबर 2022 मध्ये समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंत 176 मोठ्या अपघातांची नोंद झाली आहे. यामध्ये 278 जणांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर अपघात रोखण्यासाठी आणि आपत्कालीन मदत तत्काळ मिळावी यासाठी हा प्रकल्प महत्त्वपूर्ण आहे.
Powered By Sangraha 9.0