Shalarth Scam : शालार्थ आयटी घोटाळ्यातील धक्कादायक प्रकार ! ऑगस्ट 2023 पासूनच उघड, पण नरडकडून मौन

17 Apr 2025 11:43:37

shalarth
 
नागपूर : ( Shalarth Scam ) बोगस शालार्थ आयडी आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापकपदी झालेल्या नियुक्तीच्या प्रकरण आता अधिकच गंभीर वळणावर आहे. पराग पुडके यांची मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती करण्याचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्या वेळच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी सर्व कागदपत्रे पडताळणी समितीकडे पाठवली होती. समितीने पुडके यांनी सादर केलेले दस्तावेज बोगस ( Shalarth Scam ) ठरवले. या संदर्भात अधिकृत पत्र जारी केले. त्यानंतरही उपसंचालक उल्हास नरड यांनी हा प्रस्ताव मंजूर करून पुडके यांची नियुक्ती केली. मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्ट 2023 मध्येच समितीने कागदपत्रे बोगस असल्याचे स्पष्ट केले होते. तरीही संबंधित अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे पुडके यांची नियुक्ती केल्याची बाब पुढे आली आहे.
 
 
सर्व आरोपींच्या घरी धाड
 
पोलिसांनी बुधवारी सर्व आरोपींच्या घरांवर धाड टाकून कागदपत्रांची तपासणी केली आहे. ( Shalarth Scam ) काही महत्त्वाचे कागदपत्रे पोलिसांनी जप्त केल्याचेही समजते आहे. हे कागदपत्र फसवे प्रस्ताव तयार करण्यासाठी वापरले जात होते. समितीने कागदपत्रे बोगस असल्याची माहिती मिळाल्यानंतरही नरड यांनी अवघ्या ४-५ दिवसांत हा प्रस्ताव मंजूर केला. या बाबतीत इतरही अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याचे सांगितले जात आहे.
 
 
धंतोलीत पुन्हा एक प्रकार उघडकीस
 
धंतोली पोलिस ठाण्यात बोगस नियुक्ती आणि शालार्थ आयडी ( Shalarth Scam ) प्रकरणात आणखी एक तक्रार दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मंगळवारी संध्याकाळी राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अलाहद भांडारकर यांनी धंतोली पोलिस ठाण्यात नरड आणि इतर आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, पोलिसांनी कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे.
 
 
या प्रकरणात आणखी नवीन नावे उघड होऊ शकतात. या संपूर्ण फसवणुकीच्या प्रकारात अधीक्षक नीलेश वाघमारे यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे पोलिस तपासादरम्यान उघड झाले आहे. वाघमारे यांना आधीच निलंबित करण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध पोलिसांना अनेक महत्त्वाचे पुरावेही मिळाल्याचे सांगण्यात येते.
Powered By Sangraha 9.0