Political Bombshell Anjali Damania अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट ! पंकजांच्या फाईल्स धनंजयांकडे कशा पोहोचल्या ?

02 Apr 2025 16:13:58

anjali
 
मुंबई : Political Bombshell Anjali Damania सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप केले. धनंजय मुंडे स्वत: एक तेजस ठक्कर नावाच्या व्यक्ती बरोबर आले होते. ते अख्खा फाईलचा ठोकळा घेऊन आले होते. पंकजा मुंडे यांच्या विरोधातील त्या फाईल होत्या. त्या फाईल्सची माहिती, माझ्याकडे आधी ज्यांचा फोन आला ते तेजस ठक्कर होते आणि राजेंद्र घनवट नावाचे एक व्यक्ती होते. ते माझ्याकडे फाईल घेऊन आले. मी त्यांना व्यवस्थित सांगितले की, मी असे कुणाच्या दिलेल्या फाईलवर कधीही कारवाई करत नाही. म्हणून मी पंकजा मुंडे यांचा कोणताही विषय तेव्हा लावून धरला नाही", असे अंजली दमानिया Political Bombshell Anjali Damania यांनी स्पष्ट केले. तसेच त्यांनी धनंजय मुंडे यांचा राजेंद्र घनवट नावाच्या व्यक्तीसोबतचे फोटो दाखवत आरोपांचा नवा बॉम्ब फोडला. राजेंद्र घनवट या व्यक्तीने शेतकऱ्यांना छळून त्यांच्या जमिनी लाटल्या असा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला. विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेत अंजली दमानिया Political Bombshell Anjali Damania यांच्यासोबत पीडित शेतकरी महिला देखील होत्या. या महिलांनी देखील आपल्या सोबत घडलेल्या घटनांची माहिती दिली.
 
दालमियांचे घनवाटांवर गंभीर आरोप
 
जेव्हा मी बीडचं प्रकरण लावून धरले, अनेक विषय लावून धरले तेव्हा राजेंद्र घनवट यांचे नाव मी चॅनलच्या एक डिबेट शोमध्ये घेतले. ते घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात, इथे चेतन चिखळे नावाचा मुलगा बसला आहे, त्यांनी माझ्याशी संपर्क साधला. सर्व शेतकरी माझ्या घरापर्यंत आले आणि त्यांनी मला समजावले की, राजेंद्र घनवट नावाच्या या व्यक्तीने आमच्या सर्वांचे मोठ्या प्रमाणात छळ केले. हे राजेंद्र घनवट कोण आहेत याची आपण सुरुवात करुयात", असं अंजली दमानिया Political Bombshell Anjali Damania म्हणाल्या. यावेळी अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यासोबतचा राजेंद्र घनवट यांचा पहिला फोटो दाखवला. "हा फोटो पहिला आहे.
 
धनंजय मुंडे यांच्याबरोबर अतिशय जवळचे, जसे ते कराड बरोबर असायचे, तसे ते जवळचे असलेले राजेंद्र घनवट", असं दमानिया म्हणाल्या. यानंतर त्यांनी दुसरा फोटो दाखवला. व्यंकटेश्वरा इंडस्ट्री सर्व्हिसेस या कंपनीबद्दल म्हणजेच जीफ्लायअॅश महाजनकोकडून घ्यायची आणि मोठ्या प्रमााणात विकायची. ज्याच्यावर मी ऑफिस ऑफ प्रॉफीट याचा गुन्हा दाखल व्हावा, या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटले. त्या व्यंकटेश्वरा इंडस्ट्री सर्व्हिसेसमध्ये दोनच डायरेक्टर आहेत. यामध्ये एक आहेत, राजश्री धनंजय मुंडे, तर दुसरे राजेंद्र पोपटलाल घनवट आहेत, असा दावा अंजली दमानिया यांनी केला. "तिसरा फोटो जगमित्र शुगर नावाच्या कंपनीचा आहे. या कंपनीत आधी धनंजय मुंडे, वाल्मिक कराड हे देखील होते. आता राजश्री धनंजय मुंडे आणि राजेंद्र घनवट हे डायरेक्टर आहेत", असाही दावा अंजली दमानिया यांनी केला.
 
Powered By Sangraha 9.0