नागपूर : Wardha Yavatmal Storm Alert आज, 2 एप्रिल 2025 ला वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांत, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राच्या सूचनेनुसार, Wardha Yavatmal Storm Alert या भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पाडण्याचाही दाट शक्यता आहे.
तसेच, वर्धा जिल्ह्यात 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. वर्ध्यात आज कमाल तापमान 35°C तर किमान तापमान 22°C असण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी तीव्र पावसाची शक्यता आहे. उष्णता आणि आर्द्रता लक्षात घेता, नागरिकांना काळजी घेण्याच्या सल्ला दिला जात आहे. त्याचप्रमाणे, यवतमाळमध्ये आजचे कमाल तापमान 35°C आणि किमान तापमान 22°C आहे . दुपारनंतर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह तीव्र पावसाची शक्यता आहे.
नागरिकांसाठी महत्वाच्या सूचना :
वादळ सुरु असतांना उंच झाडे, विजेचे खांब आणि अस्थिर संरचना पासून दूर राहावे.
विजांच्या कडकडाट होत असताना सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, शक्य असल्यास घराबाहेर पडू नये.
वाहनचालकांनी अशा वातावरणात वाहन चालवताना वेग मर्यादित ठेवावा.
नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करावे.