Swiggy Tax Notice स्विगी अडचणीत ? आयकर विभागाची नोटीस जारी

03 Apr 2025 19:35:22

swi 
दिल्ली : Swiggy Tax Notice फूड आणि किराणा डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कंपनीला आयकर विभागाकडून 158 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर आकारणी आदेशाची नोटीस Swiggy Tax Notice पाठवण्यात आली आहे. एप्रिल 2021 ते मार्च 2022 या कालावधीसाठी ही कर नोटीस त्यांना प्राप्तिकर विभागाच्या बेंगळुरू उपायुक्त कार्यालयातून दिली आहे.
 
 
आयकर कायद्यातील कलम 37 अंतर्गत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. स्विगीने आपल्या एका एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे की कंपनीला एप्रिल 2021 ते मार्च 2022 या कालावधीत हा मूल्यांकन आदेश प्राप्त झाला आहे. यामध्ये 1,58,25,80,987 रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न जोडले गेले आहे.
Powered By Sangraha 9.0