Startup Reality Goyal Remark स्टार्टअप्सने बेकारांना बनवलं श्रीमंतांचा डिलिव्हरी बॉय ! मंत्री गोयल

05 Apr 2025 15:28:59

goel 
 दिल्ली : ( Startup Reality Goyal Remark )  भारतीय स्टार्टअप्स फुड डिलिव्हरी आणि वेगाने वस्तूंच्या डिलिव्हरीवर लक्ष केंद्रीत करत आहेत. बेरोजगार तरुणांना श्रीमंतांसाठी डिलिव्हरी एजंट बनवण्याचे काम सुरू आहे. अ‍ॅप्सच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना स्वस्त कामगार बनवले जात आहे. यामुळे श्रीमंतांना घराबाहेर न पडता त्यांचे जेवण त्यांना मिळत आहे, अशा शब्दांत केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी आपल्या स्टार्टअप्सचा ( Startup Reality Goyal Remark ) कसा बोजवारा वाजत आहे ते दाखवून दिले.
 
 
दिल्ली येथे तीन दिवसांच्या स्टार्टअप महाकुंभ 2025 च्या दुसऱ्या आवृत्तीला सुरुवात झाली. यावेळी गोयल ( Startup Reality Goyal Remark ) बोलत होते. ते म्हणाले की, सध्या बाजारात ई कॉमर्स कंपन्यांची चलती आहे. लाखो लोकांना या कंपन्यांनी रोजगार दिला आहे. हे चांगले की वाईट यावर कोणी विचार केलेला नाही. कारण या नोकरीत महिन्याकाठी 20 ते 25 हजार रुपये डिलिव्हरी बॉय ला मिळत आहेत. परंतु, गोयल यांनी अशा प्रकारच्या नोकरी देण्यावर आक्षेप नोंदविला आहे. त्यांच्या मते, हे डिलिव्हरी अ‍ॅप बेरोजगार गरीबांना श्रीमंतांचे डिलिव्हरी एजंट बनवत आहेत.
 
झटपट श्रीमंती होऊन जगावर राज्य हवे ?
 
आपण जेव्हा डीप टेककडे पाहतो तेव्हा इकोसिस्टममध्ये फक्त 1000 स्टार्टअप्स आहेत. अल्पावधीत संपत्ती निर्मितीवर लक्ष केंद्रित करायचे की आंतरराष्ट्रीय पातळीवर जायचे हे स्टार्टअप्सनी  ( Startup Reality Goyal Remark ) ठरवायला हवे. भारतीयांनी जागतिक पातळीवर जाऊन मोठा विचार करण्याची गरज आहे. इतर कंपन्यांत काम करणाऱ्यांनी जगात आपली ओळख बनवावी, असे आवाहन गोयल यांनी केले.
 
- 3000 स्टार्टअप्स महाकुंभ मध्ये सहभागी. गतवर्षीपेक्षा दुप्पट
- 64 देशांच्या प्रतिनिधींचा नवकल्पनांसह सहभाग
- 1.6 लाख स्टार्टअप्सना अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाची मान्यता
- 09 वर्षे पूर्ण झाली गेल्या 16 जानेवारी रोजी स्टार्टअप इंडियाला
 
 
Powered By Sangraha 9.0