मुंबई : ( Jitendra Awhad vs BJP ) वक्फ सुधारणा विधेयकाला लोकसभेत आणि राज्यसभेत मंजुरी मिळाल्यानंतर राष्ट्रपतींनीही त्यावर सही केली आहे. त्यामुळे आता वक्फ सुधारणा विधेयकाचा कायदा झाला आहे. यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केले आहे. हे ट्विट सध्या मोठ्या चर्चेचा विषय बनले आहे. या ट्विटमधून जितेंद्र आव्हाड यांनी भाजपावर निशाणा साधला ( Jitendra Awhad vs BJP ). राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र 'ऑर्गनायझर' नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अंकात, ख्रिश्चन धर्मियांकडील जमिनीचा मुद्दा उचलला तसेच ही जमीन वक्फपेक्षा अधिक असल्याचे सदर अंकातील लेखामध्ये नमूद केले.
वक्फच्या ताब्यात असलेल्या जमिनी या त्यांच्या पूर्वजांच्या आणि दान-धर्मातून मिळालेल्या जमिनी आहेत. त्या कुणा एका मुस्लीम इसमाच्या किंवा एका संस्थेच्या मालकीच्या नव्हत्या. वक्फ या शब्दाचा अर्थच मूळात दान असल्याने या सर्व जमिनी दानातून आल्याचे स्पष्ट होत आहे. भारतभर ख्रिश्चन धर्मियांकडे अनेक जमिनी आहेत. या जमिनी चर्चच्या ताब्यात आहेत अन्.... हे कोणालाही मान्य करावेच लागेल की, ख्रिश्चन धर्मियांनी वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात अभूतपूर्व काम केले आहे. भारतभर त्यांच्या शैक्षणिक संस्था पसरल्या आहेत. मला सांगायला अभिमान वाटतो की, मी देखील एका ख्रिश्चन संस्थेच्या शाळेतच शिक्षण घेतले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ( Jitendra Awhad vs BJP ) मुखपत्रात ख्रिश्चन धर्मियांच्या जमिनीचा विषय मांडल्यानंतर पहिला आवाज केरळात उचलला गेला आहे. त्यानंतर दिल्लीत बोंबाबोंब सुरू झाल्यावर ऑर्गनायझरने लेखातील तो भाग वगळला. तरीही त्यांच्या मनातील दुजाभाव आणि विष हे काही लपून राहिलेले नाही. गोळवलकर यांनी आपल्या " बंच ऑफ थॉटस" आणि “नेशनहूड आयडेंटीफाइड“ पुस्तकात ख्रिश्चन आणि मुस्लिमांना देशाचे नागरिकत्व देण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करून त्यांना दुय्यम नागरिकत्व देण्याबाबत केले होते. ज्यावेळेस वक्फ बद्दल राज्यसभा आणि लोकसभेत चर्चा सुरू होती. त्यावेळेस हा लेख प्रसिद्ध करण्यात आला. त्यामुळे कुणी काहीही म्हटले तरी मातृसंस्था आणि भाजपचे खरे मार्गदर्शक हे गोळवलकर हेच ( Jitendra Awhad vs BJP ) आहेत. अन् त्यांच्या पुस्तकातच हे सर्व नमूद करण्यात आले आहे. कालांतराने ख्रिश्चन धर्मियांकडील जमिनी काढून घेण्यात येणार, ही न लपलेली गोष्ट आहे.