Harshvardhan Sapkal : पेट्रोल डिझेलवर जिझिया ? सरकारवर सपकाळांचा राजकीय बॉम्ब

08 Apr 2025 19:45:19


harsh sa
 
मुंबई : ( Harshvardhan Sapkal ) जागतिक बाजारात क्रूड ऑईलचे दर सातत्याने कमी होत असताना त्याचा फायदा देशातील जनतेला होत नाही. आज आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईल 65 डॉलर प्रति बॅरल असताना देशात पेट्रोलचे दर 109 रुपयाच्या आसपास तर डिझेलचे 93 रुपयांच्यावर आहे. भाजपा सरकार इंधनावर अन्यायकारक जिझिया कर आकारून जनतेची लूट करत आहे. क्रूड ऑईलचे कमी झालेले दर व कर रुपी लूट कमी केली तर पेट्रोल 51 रुपये आणि डिझेल 41 रुपये प्रति लिटर करणे शक्य आहे ते सरकारने करून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ( Harshvardhan Sapkal ) यांनी केली आहे.
हेही वाचा - Piyush Goyal on Indian startups : चीन मायक्रोचिप्स बनवतंय, भारतीय मात्र आईस्क्रीम - उद्योग मंत्री पीयूष गोयल

हर्षवर्धन सपकाळ ( Harshvardhan Sapkal ) यांनी आकडेवारीसह पेट्रोल, डिझेलचे दर कसे कमी करता येऊ शकतात हे स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकार असताना आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलचे दर 145 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले असतानाही पेट्रोल 70 रुपये लिटर तर डिझेल 45 रुपये लिटर होते. मग आता तर क्रूड ऑईल 65 डॉलर आहे तरीही पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी केल्या जात नाहीत. युपीए सरकार असताना पेट्रोलवर 9.56 रुपये तर डिझेलवर 3.48 रुपये अबकारी कर (एक्साईज टॅक्स) होता, तो भाजपा सरकारने वाढवत 32 रुपयांपर्यंत केला, काँग्रेसची पत्रकार परिषद सुरु असताना एक्साईज टॅक्स मध्ये आणखी 2 रुपयांची वाढ झाली. 1 रुपया रोड इन्फ्रास्ट्रक्चर सेस होता तो आता 18 टक्के केला आहे आणि वरून टोल वसुलीही सुरुच आहे, यातील काळेबेरे काय ते समोर आले पाहिजे तसेच कृषी सेस लावून केंद्र सरकार जनतेची लूट करत आहे. एलपीजी सिलेंडर सुद्धा 400 ते 450 रुपये होता तो आता दुप्पट झाला आहे. आजच एलपीजी सिलींडरच्या दरात 50 रुपयांची वाढ केली आहे, ही सरकारी लूट आहे, ती तात्काळ थांबवावी असेही ते म्हणाले.

रिलायन्स, नायरा कंपन्या सरकारच्या लाडक्या आहेत का ?

रशिया भारताला बाजारभावापेक्षा 30 टक्के कमी दराने क्रूड ऑईल देते, त्याचा थेट फायदा हा रिलायन्स व नायरा या दोन कंपन्यांना होतो. ह्या दोन कंपन्या सरकारच्या लाडक्या आहेत का ? क्रूड ऑईलच्या किमती कमी होत असताना त्याचा फायदा जनतेला न होता ऑईल कपन्यांना होत आहे. स्वस्तातले क्रूड ऑईल घेऊन या कंपन्या युरोपमध्ये विकून नफेखोरी करत आहेत. सर्वसामान्यांना याचा फायदा होण्यापेक्षा सरकार मोठ्या उद्योगपतींना लाभ देत आहे, असे सपकाळ ( Harshvardhan Sapkal ) म्हणाले.
 
 
Powered By Sangraha 9.0