नागपूर : ( Mother vs Son Court Battle ) पतीचे अपघाती निधन झाल्यानंतर त्यांची सरकारी नोकरी जन्मदात्रीला मिळाली. ती शासकीय सेवेत रुजू झाली आणि स्वत:च्या मुलासह मुलीचा सांभाळ करू लागली. परंतु, माहेरी राहणाऱ्या जन्मदात्रीच्या नशिबी पुत्रवियोग ( Mother vs Son Court Battle ) लिहिला होता. अवघ्या सात वर्षांच्या रोहीतला सासरचे मंडळी मुलाला स्वत:सोबत घेऊन गेले. पुढे हे प्रकरण न्यायालयात पोहचले आणि मुलाला अठराव्या वर्षापर्यंत पोटगी म्हणून महिन्याला आठ हजार देण्याचे जन्मदात्रीने कबुल केले. आज हा मुलगा अठरा वर्षांचा झाला असून, जन्मदात्रीला मिळालेली वडिलांची शासकीय नोकरी आपल्याला देण्यात यावी, या मागणीसह उच्च न्यायालयात पोहचला आहे.
बंदद्वार तब्बल दीड तास सुनावणी
2023 साली दाखल झालेल्या या याचिकेवर न्यायमूर्तींद्वय नितीन सांबरे आणि वृषाली जोशी यांच्यासमक्ष बंदद्वार तब्बल दीड तास सुनावणी झाली. खंडपीठाने पर्याय काढण्याचा प्रयत्न करताना, जन्मदात्रीला 'काय देऊ शकता' असे विचारले. क्षणार्धात तिने उत्तर देत प्राधिकरणाने मंजूर केलेले मुलाच्या वाट्याचे सात लाख आणि पोटगी म्हणून महिन्याला आठ हजार देण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर मात्र उच्च न्यायालयाने मुलाच्या वर्तनावर नाराजी व्यक्त ( Mother vs Son Court Battle ) करत, 'आईसाठी तू काय केलेस' अशी परखड विचारणा केली. याचिकेवरील पुढील सुनावणी 7 मे रोजी निश्चित करण्यात आली. हे कुटुंब अकोल्यातील असून, याचिकाकर्त्या मुलाच्या वतीने अॅड. अभिषेक भुईभार यांनी बाजू मांडली.