मुंबई : ( Bhuvneshwar Kumar ) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) चा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने क्रिकेट जगातील सर्वात लोकप्रिय लीग स्पर्धा, आयपीएलमध्ये नवा इतिहास रचला आहे. त्याने आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या वेगवान गोलंदाजांमध्ये ड्वेन ब्राव्होचा १८३ विकेट्सचा विक्रम मोडला आहे.
२०१२ ते २०२२ दरम्यान भारतासाठी २२९ आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा भुवनेश्वर ( Bhuvneshwar Kumar ) ३५ वर्षांचा असूनही आयपीएलमध्ये एक विश्वासार्ह गोलंदाज म्हणून ओळखला जातो. या स्विंग स्पेशालिस्ट गोलंदाजाकडे अजूनही सामन्याच्या सुरुवातीच्या षटकांमध्ये तसेच शेवटच्या (डेथ) षटकांमध्ये विकेट घेण्याची क्षमता आहे.
मुंबई इंडियन्स (एमआय) विरुद्धच्या रोमांचक सामन्यात १८ व्या षटकात भुवीने मुंबईचा फॉर्मात असलेला फलंदाज तिलक वर्मा (२९ चेंडूत ५६ धावा) याचा महत्त्वाचा बळी घेतला. त्यामुळे, आरसीबीला सामन्यावर नियंत्रण मिळवण्यास मदत झाली आणि अखेर आरसीबीने १२ धावांनी विजय मिळवला.