Hanuman Jayanti Mystery : वर्षांतून दोन वेळा साजरी होते हनुमान जयंती ? जाणून घ्या या मागचं अद्भुत सत्य

Top Trending News    09-Apr-2025
Total Views |
 

new han
 
हनुमान ( Hanuman Jayanti Mystery ) जन्म कायमच भक्तांसाठी शक्ती, भक्ती आणि विजयाचे प्रतीक ठरले. देशभरात राम हनुमान भक्त मोठ्या भक्तीभावाने हनुमान जयंती साजरी करतात. परंतु, तुम्हालाही वाचून आश्चर्य वाटेल की, हनुमान जयंती भारतात वर्षातून दोनदा साजरी केली जाते. देशातील बहुतांश हिंदू पंचांगानुसार हनुमान जयंती मुख्यतः चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला साजरी करतात. काही ठिकाणी ती कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला, म्हणजेच नरक चतुर्दशीच्या दिवशी साजरी केली जाते. तामिळनाडू आणि केरळमध्ये मार्गशीर्ष अमावास्येला तर ओडिशामध्ये वैशाख महिन्याच्या पहिल्या दिवशी हनुमान जयंती ( Hanuman Jayanti Mystery ) साजरी होते. एका मान्यतेनुसार, हनुमानजींचा जन्म चैत्र पौर्णिमेला, मंगळवारी सकाळी 6:03 वाजता, मेष लग्नात आणि चित्रा नक्षत्रात एका गुहेत झाला. तर दुसऱ्या मतानुसार, त्यांचा जन्म कार्तिक महिन्यातील कृष्ण चतुर्दशीला, स्वाती नक्षत्रात आणि मेष लग्नात झाला होता.
 
मिळाले अमरत्वाचे वरदान
 
काही विद्वानांच्या मते, एक तिथी हनुमानजींच्या जन्मदिवस ( Hanuman Jayanti Mystery ) म्हणून साजरी केली जाते तर दुसरी तिथी त्यांच्या पराक्रमाचा आणि विजयाचा उत्सव म्हणून साजरी केली जाते. असे म्हणतात, की चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमानजींनी सूर्याला फळ समजून गिळंकृत करण्यासाठी उडी घेतली, त्यावेळी त्याच्या दैवी रूपाचे दर्शन सर्वांना घडले. याच दिवशी राहूही सूर्याला ग्रासण्यासाठी आला होता, पण सूर्याने हनुमानजींना दुसरा राहू समजून गोंधळून टाकले. तर दुसरा संदर्भ म्हणज हनुमानजींच्या ( Hanuman Jayanti Mystery ) भक्तीने प्रसन्न होऊन माता सीतेने त्यांना अमरत्वाचे वरदान दिले आणि हा प्रसंग नरक चतुर्दशीच्या दिवशी घडला होता.
 
 
सामान्य: बहुतांश लोक असे मानतात की हनुमानजींचा खरा जन्म चैत्र पौर्णिमेच्या दिवशीच झाला. त्यांच्या आईचे नाव अंजनी आणि वडिलांचे नाव केसरी होते. ते पवनपुत्र आणि शंकरसुवन म्हणूनही ओळखले जातात. भगवान शंकराचे सर्वात बलवान व बुद्धिमान रुद्रावतार म्हणून त्यांची ख्याती आहे. याच विविध परंपरांमुळेच हनुमान जयंती ( Hanuman Jayanti Mystery ) भारतभर विविध प्रकारांनी आणि दिवसांनी साजरी होते.
 
हनुमान नवरात्र म्हणजे काय ? 
 
खरंतर फार थोड्या लोकांना माहित असलेली गोष्ट म्हणजे हनुमानाचेही नवरात्र असतात आणि त्यांना हनुमान नवरात्र किंवा हनुमान नवाह्निक (नऊ दिवसांची पूजा) असे म्हणतात. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील हनुमान जयंतीपूर्वीचे नऊ दिवस म्हणजे हनुमान नवरात्र देशातील काही भागात साजरे केले जातात. हे नवरात्र चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होऊन चैत्र पौर्णिमेला हनुमान जन्माला संपते. या नऊ दिवसांच्या काळात भक्त हनुमानजींची विशेष पूजा, व्रत, हनुमान चालीसा, सुंदरकांड आणि रामायण पठण करतात. भक्त सामर्थ्य, धैर्य, आणि संकटांवर मात करण्यासाठी हनुमानजींचं उपासना करतात.