गर्दी आणि अफवांमुळे चेंगराचेंगरी - रात्री 2 वाजता संगम घाटावर मोठी गर्दी होती. धक्का-बुक्कीमुळे गोंधळ उडाला आणि लोक घाबरून इकडे-तिकडे धावू लागले. 

रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या आणि जखमींना तात्काळ रुग्णालयात नेण्यात येत आहे.

जखमी आणि मदतकार्य - काही वृद्ध व महिला खाली पडल्या. लोक घाईत त्यांच्यावरून पळाले, ज्यामुळे 50+ लोक गंभीर जखमी झाले.

अफवांमुळे आणखी भितीचे वातावरण निर्माण झाले आणि त्यामुळे परस्थिती आणखीच खराब झाली. 

सुरक्षेच्या उपाययोजना - NSG (राष्ट्रीय सुरक्षा दल) तातडीने सक्रिय झाले. परिस्थिती आता नियंत्रणात आहे. संगमवरील सर्व घाटांवर शांततेत स्नान सुरू आहे.

सुरक्षिततेसाठी सूचना - अफवांवर विश्वास ठेवू नका. सुरक्षा नियमांचे पालन करा, सुरक्षित रहा, जागरूक रहा. संगम घाटच निवडण्याचा हट्ट करू नका.

सूचना - प्रयागराजच्या सर्व घाटांना संगम मानून जिथे आहात तिथे स्नान करा. स्नान झाल्यावर लगेच घाट सोडून आपल्या कुटुंबाजवळ परत जा. धैर्य ठेवा, सहकार्य करा आणि महाकुंभ शांततेत साजरा करा !